Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेरात सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभारणार : आ. खताळ

।संगमनेर/प्रतिनिधी।११ संगमनेर शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करणार, अशी घोषणा आपण केली होती. त्यानुसार त्यापुतळ्या स

बिलोली पोलीस ठाण्यात शांतता बैठक संपन्न
हॉटेलच्या दुसर्‍या मजल्यावरून पडल्याने हैदराबादच्या मुलीचा मृत्यू
राहुल गवळीच्या कुटुंबियांना न्याय द्या
PHOTO-2025-04-11-19-15-14.jpg

।संगमनेर/प्रतिनिधी।११

संगमनेर शहरामध्ये क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचा पुतळा उभा करणार, अशी घोषणा आपण केली होती. त्यानुसार त्यापुतळ्या संदर्भातील सर्व कागदपत्रे पूर्ण करण्याचे काम सुरू आहे. लवकरच त्यांचा संगमनेर शहरात पुतळा उभारला जाणार असल्याचा विश्वास आमदार अमोल खताळ यांनी दिला.

  क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंती निमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला आ. अमोल खताळ यांच्या शुभहस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर आ खताळ बोलताना म्हणाले की, पूर्वीच्या काळी  वंचित पीडित उपेक्षित समाजाला कमी लेखले जात होते. त्या समाजाला क्रांती सुर्य महात्मा फुले यांनी मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांनी पुणे येथील भिडे वाडा येथे मुलींसाठी पहिली शाळा सुरु केली आणि शिक्षणाची द्वारे खुली करून दिली. त्यामुळे आज सर्वच क्षेत्रामध्ये महिला आघाडी वर आहे. याचे खरे श्रेय महात्मा ज्योतिबा फुले व सावित्री बाई फुले यांना असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी महात्मा फुले युवा प्रतिष्ठानचे बंटी मंडलिक, सुमित अभंग, किशोर ढोले, संपत गलांडे, सुभाष ताजने, बाळासाहेब अभंग, नितीन मेहेत्रे, तुषार घोडेकर, प्रशांत अनाप, अतुल अभंग, प्रतीक ढोले, संतोष अभंग, रवींद्र गडगे , लखन अभंग ,चैतन्य हिरे,, आशिष ताजणे ,बाळासाहेब गाडेकर ,प्रसाद गोरे, सौ पायल ताजणे ,नीलम गलांडे , सुनिता माताडे, शुभांगी माताडे ,सुवर्णा ताजणे ,नम्रता अभंग, संगीता मंडलिक ,सविता पावके ,अश्विनी ढोले , जयश्री पुंड , उषा अभंग ,मिनल अभंग ,स्मिता अभंग आणि ज्योती अभंग आदी मान्यवर उपस्थित होते.

COMMENTS