Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावित्रीबाई फुले संस्थेचे निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण उत्साहात

पाथर्डी ः जाटदेवळे सावित्रीबाई फुले शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक विकास संस्था फुलेनगर पाथर्डी संस्थेअंतर्गत तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात

अँग्लो उर्दू हायस्कूलला 24 संगणकांची भेट
*म्युकर मायकोसिसचे संक्रमण हवेतून होऊ शकते – डॉ.गुलेरिया | पहा सुपरफास्ट २४ | LokNews24*
द्वारकामाई साई मंदिरात महाआरती व महाप्रसाद

पाथर्डी ः जाटदेवळे सावित्रीबाई फुले शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक विकास संस्था फुलेनगर पाथर्डी संस्थेअंतर्गत तालुकास्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. या निबंध स्पर्धेसाठी गट अ पाच ते सात या गटातील विषय निसर्गाचे बदलते स्वरूप व कोरोना भयंकर संकट तसेच दुसर्‍या गटातील ब इयत्ता आठवी ते दहावी या गटासाठी विषय भारताची चांद्रयान मोहीम व मोबाईल शाप की वरदान या विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आल्या होत्या.
स्पर्धेचे आयोजन दुर्गादेवी माध्यमिक विद्यालय जाटदवळे तालुका पाथर्डी शाळेचे सह शिक्षक महादेव दौंड सर तसेच संस्थेने नियोजन केलेली संयोजन कमिटी यांनी कामकाज पाहिले. तर स्पर्धेचा निकाल बाळासाहेब फुंदे, वैभव साप्ते यांनी निबंध स्पर्धेचा निकाल घोषित केला. दुर्गादेवी विद्यालयातील प्रथम क्रमांक प्रदीप राठोड द्वितीय क्रमांक सद्गुरु जगताप तृतीय क्रमांक सोनाली गीते श्री आनंद विद्यालय चिचोंडी या विद्यार्थ्यांनी निबंध स्पर्धेमध्ये बक्षीस मिळवले व निबंध स्पर्धेचे मार्गदर्शक महादेव दौंड सर यांचे संस्थेचे अध्यक्षा लता सानप यांनी कौतुक केले सहभागी विद्यार्थ्यांचे संस्थेच्या अध्यक्षा लता सानप सचिव जगन्नाथ सानप यांनी प्रोत्साहित केले. प्राचार्य राजाराम नाकाडे यांनी यावेळी विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या स्पर्धेत भाग घेऊन उपक्रमशील राहावे असे आवाहन केले.

COMMENTS