Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा सारवरकर गौरव यात्रा संपन्न…

नाशिक – भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नाशिक पुर्व विधानसभा क्षेत्रातील आडगांव नाका येथील स्वा.सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा अशी सावरकर गौरव

पुण्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार
नाल्याच्या पुरात बैल गाडी वाहून गेल्याचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद.
आरोग्य संशोधन संस्थेमध्ये सातारा जिल्ह्यातील दोघांची निवड

नाशिक – भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून नाशिक पुर्व विधानसभा क्षेत्रातील आडगांव नाका येथील स्वा.सावरकर स्मारक ते पंचवटी कारंजा अशी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. सावरकर स्मारक येथील सावरकरांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करून श्रीफळ वाढवून या गौरव यात्रेचा शुभारंभ करण्यात आला. यात्रेमधे सावरकर प्रेमी नागरीकांनी भगव्या रंगाच्या मी सावरकर लिहीलेल्या टोप्या परिधान केलेल्या होत्या. यात्रामार्गामध्ये गुलाब पाकळयांची उधळण करून रांगोळया काढून तसेच फटाके फोडत  ठिकठिकाणी यात्रेचे स्वागत करण्यात आले. भगवे ध्वज व भगव्या रंगाच्या मफलर यात्रेतील सावरकर प्रेमी नागरीकांनी परिधान केले होते. राष्ट्रभक्ती तुझे नाव….सावरकर सावरकर, देशभक्ती तुझे नाव सावरकर सावरकर….., भारत माता की जय….., स्वात्र्यवीर सावरकरांचा विजय असो… अशा घोषणा देत सावरकरांचा जय जयकार करण्यात आला.  या यात्रेचा समारोप पंचवटी कारंजा येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुर्णाकृती पुतळयास पुष्पहार अर्पण करत अभिवादन करून करण्यात आला. 

        या यात्रेमध्ये केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार, नाशिक पुर्व विधानसभा क्षेत्राचे आ.ॲड.राहुल ढिकले, भाजपाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मण सावजी, बाळासाहेब सानप, भाजपा शहराध्यक्ष गिरीष पालवे, संघटन सरचिटणीस प्रशांत जाधव, सुनिल केदार, युवा मोर्चा अध्यक्ष अमित घुगे, तपोवन मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, पंचवटी मंडल अध्यक्ष ज्ञानेश्वर काकड, उत्तम उगले, महेश महंकाळे, सोमनाथ बोडके, दिगंबर धुमाळ, धनंजय माने, राहुल कुलकर्णी, शाम पिंपरकर, पुनम ठाकुर, हर्षद वाघ, प्रविण भाटे, विशाल जेजुरकर, धनंजय पुजारी, हेमंत शेट्टी, रुची कुंभारकर, सुरेश खेताडे, प्रियंका माने, कमलेश बोडके, अरुण पवार, रंजना भानसी, नितीन मळोदे, किरण सोनवणे, मनोज हिरे, विजय पगार, संजय संघवी,  प्रियंका कानडे, रोहिणी दळवी, स्मिता मुठे, साक्षी दिंडोरकर, प्रभाकर येवले, उल्हास धनवटे, मंजुषा लोहगावकर, भारती माळी, प्रशांत वाघ, विलास कारेगांवकर, हरीभाऊ लासुरे, सविता सिंग, सोमनाथ वडजे, ऋषिकेश आहेर, मयुर नाटकर, नाना वाघ, राहुल शिरसागर,  सुनिल फरताळे, बापुराव शिनकर, उज्वला बेलसरे, शंतनु शिंदे, सौरभ सोनवणे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS