Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डोंबिवलीत सावरकर गौरव यात्रेचे आयोजन

कल्याण प्रतिनिधी - काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्या विरोधात राज्यात शिवसेना- भाजपा च्या वतीने ठिकठिकाणी सावर

महावितरणमध्ये स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी
शेतकर्‍यांना टोपी घालण्यात पवार-मोदी आघाडीवर : राजू शेट्टी
माजी पोलिस अधिकारी प्रदीप शर्माला दिलासा

कल्याण प्रतिनिधी – काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सावरकरांसंदर्भात केलेल्या वक्तव्या विरोधात राज्यात शिवसेना- भाजपा च्या वतीने ठिकठिकाणी सावरकर गौरव यात्रा काढली जात आहे. या यात्रेत जास्तीत जास्त सावरकर प्रेमी नागरिकांनी सहभागी व्हावे असे आवाहन शिवसेना आणि भाजपकडून करण्यात आले होते. त्यामुळे कल्याण ग्रामीण आणि डोंबिवली विधानसभा मतदार संघातील सावरकर प्रेमी एकत्र येत आज सायंकाळी सावरकर गौरव यात्रा काढण्यात आली. ह्या यात्रेची सुरुवात भागशाळा मैदान येथून होऊन त्याची सांगता फडके रोडवरील आप्पा दातार चौकात झाली. या यात्रेत सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण सहभागी झाले होते. तर शिवसेना शिंदे गटाचे डोंबिवली शहर प्रमुख राजेश मोरे तसेच शिवसेना – भाजप गटाचे प्रमुख कार्यकर्ते व सावरकर प्रेमी मोठ्या संख्येने रॅलीत सहभागी झाले होते. यावेळी सावरकरांना भारतरत्न पुरस्कार देण्याची मागणी गौरव रॅलीत करण्यात आली.

COMMENTS