अहिल्यानगर : सत्यशोधक समाजाचे 42 वे राज्यस्तरीय अधिवेशन 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 रोजी अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे. त्यासंदर्भात नियोजनाची
अहिल्यानगर : सत्यशोधक समाजाचे 42 वे राज्यस्तरीय अधिवेशन 30 नोव्हेंबर व 1 डिसेंबर 2024 रोजी अहिल्यानगर या ठिकाणी होणार आहे. त्यासंदर्भात नियोजनाची बैठक रविवार 20 ऑक्टोबर रोजी नक्षत्र लॉन्स, बुरुडगाव रोड, अहमदनगर येथे माजी अध्यक्ष उत्तमराव पाटील व सत्यशोधक समाज संघाचे अध्यक्ष अरविंद खैरनार यांच्या उपस्थितीत संपन्न झाली.
इबटा या शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष व सत्यधर्मीय विधीकर्ते उत्तरेश्वर मोहोळकर यांनी अधिवेशनाची भूमिका विशद केली. भारतातील तमाम शूद्रातिशूद्र यांना सांस्कृतिक, सामाजिक, आर्थिक, मानसिक व शैक्षणिक गुलामीतून मुक्त करण्यासाठी राष्ट्रपिता जोतिराव फुले यांनी 24 सप्टेंबर 1873 रोजी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. यावर्गाची अज्ञान, अंधश्रद्धा, शोषण, शेतकरी व मजुरांची होणारी पिळवणूक व गुलामगिरी नष्ट व्हावी यासाठी या सामाजिक संघटनेची स्थापना केली. या संघटनेमध्ये आतापर्यंत सावित्रीबाई फुले, नारायण मेघाजी लोखंडे, लहुजी साळवे, फातिमा शेख, सयाजीराव गायकवाड महाराज, केळुसकर गुरुजी, भास्करराव जाधव, राजर्षी शाहू महाराज, कृष्णराव भालेकर, बाबासाहेब आंबेडकर, प्रबोधनकार ठाकरे, कर्मवीर भाऊराव पाटील, मुकुंदराव पाटील, पंजाबराव देशमुख आदी महापुरुषांनी योगदान दिले. तथाकथित स्वातंत्र्याला 75 वर्ष होऊन गेलेत परंतु आज सुद्धा शूद्रातिशूद्र समाजाचे शोषण थांबलेले नसून उलट वेगवेगळ्या प्रकारे शोषण सुरूच आहे म्हणजेच आज सुद्धा भारत देशाला सत्यशोधक समाजाच्या विचारांची आवश्यकता आहे शोषणमुक्त समाज हेच सत्यशोधक समाज संघाचे ध्येय आहे. सत्यशोधक समाजाला 150 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल नाशिक येथे समाजाचे 41 वे राज्यस्तरीय अधिवेशन नाशिक येथे यशस्वीरित्या संपन्न झाले. तसेच ज्ञानज्योती सावित्रीमाई फुले यांच्या जन्म गावी म्हणजे नायगाव जिल्हा सातारा येथे 10 मार्च 2024 रोजी राज्यस्तरीय पहिले महिला अधिवेशन यशस्वी करण्यात आले. यानंतर ज्ञानदेव खराडे यांनी या राज्यस्तरीय अधिवेशनासाठी विविध समित्यांची स्थापने संदर्भात चर्चा करून केली. यामध्ये संयोजन समिती, स्वागत समिती, भोजन समिती, कार्यक्रम पत्रिका तयार करणे आदी समित्यांचा समावेश होता. सत्यशोधक समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते संजय गारुडकर यांनी कोणतीही चळवळ पुढे समर्थपणे घेऊन जाण्यासाठी तन-मन-धनाने काम करावे लागते असे सांगितले. सत्यशोधक विचार व आपली मूळ कृषी संस्कृती घराघरापर्यंत जाण्यासाठी सत्यशोधक समाजाची दिनदर्शिका दरवर्षी प्रकाशित केली जाते. याही वर्षी तिचे प्रकाशन केले जाईल. या राज्यस्तरीय अधिवेशनाची स्मरणिका काढण्यात येणार असून या स्मरणिकेचे संपादनाची जबाबदारी अहमदनगर येथील प्रा.डॉ. सुधाकर शेलार, प्रा.डॉ महेबूब सय्यद, मुंबई विद्यापीठाच्या प्रा.डॉ. वंदना महाजन व शेवगाव चे प्रा. डॉ. गजानन लोंढे यांनी जबाबदारी स्वीकारली. या अधिवेशनास महाराष्ट्रातून जवळपास 22 जिल्ह्यातून सत्यशोधक समाजाचे कार्यकर्ते या अधिवेशनास उपस्थित राहणार आहेत म्हणूनच काटेकोर नियोजन करावे लागेल असे अरविंद खैरनार यांनी सांगितले. या नियोजनासाठी सत्यशोधकांचे आधारवड भानुदास बापू बोराटे, क्रांतीज्योती मल्टीस्टेट चे चेअरमन, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी भाऊसाहेब जाधव, अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे राज्य उपाध्यक्ष अंबादास गारुडकर तसेच प्रा.एल.बी. जाधव व रामचंद्र भागवत आदी. मान्यवर तसेच अहिल्यानगर, पारनेर, श्रीगोंदा, जामखेड, कर्जत, नेवासा, अकोले, श्रीरामपूर, राहुरी या तालुक्यातून मोठ्या संख्येने सत्यशोधक उपस्थित होते. रोहिदास पुंड सर यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.
COMMENTS