Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोयत्याने वार करून सरपंचाचा टोळक्याकडून खून

पुणे ः पुण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणार्‍या मावळ तालुक्यात कोयत्याने वार करून टोळक्याने सरपंचांची हत्या केली. शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रव

पाचशे टन वजनाचा पूल चोरीला !
लोणंद येथे शिवजयंती दिनी श्रीमंत कोकाटे यांचे व्याख्यान; इतिहास संशोधकाच्या शब्दांची धार पुन्हा गरजणार
मुंबईला केंद्रशासित करण्याचा सोमय्यांचा कट – संजय राऊत

पुणे ः पुण्यातील प्रतिशिर्डी समजल्या जाणार्‍या मावळ तालुक्यात कोयत्याने वार करून टोळक्याने सरपंचांची हत्या केली. शिरगाव गावचे विद्यमान सरपंच प्रविण गोपाळे यांच्यावर शनिवारी रात्री शनिवारी रात्री हा हल्ला झाला. प्रवीण साहेबराव गोपाळे (वय -47)हे शिरगाव गावचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे विद्यमान सरपंच होते.
काही दिवसांपूर्वीच शिरगाव ग्रामपंचायत संपूर्णतः बिनविरोध निवडून आलेली होती. शिरगावचे सरपंच प्रविण गोपाळे हे शनिवारी रात्री उशीरा साई मंदिरासमोर शिरगाव चौकात आले होते. त्यावेळी त्यांच्यावर पाळत ठेऊन असलेल्या दोन जणांनी सुरवातीला नेमके ते कुठे आणि कोणासोबत आहे हे हेरले. त्यानंतर थोड्या वेळात पुन्हा तीन जण दुचाकीवर त्याठिकाणी येऊन त्यांनी थेट टोळक्यानी धारदार कोयत्याने त्यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. गोपाळ रस्त्याने पळत सुटले असता आरोपींनी त्यांचा पाठलाग करून त्यांच्या चेहर्‍यावर, डोक्यावर कोयत्याने वार केले. यात सरपंच प्रविण गोपाळे हे गंभीर जखमी झाले, त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने सोमाटणे फाटा येथील पवना हॉस्पिटल रुग्णालयात दाखल कऱण्यात आले. मात्र, या घटनेत त्यांचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. या घटनेची माहिती मिळताच, पोलिस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी आरोपीचा शोध सुरू केला आहे. या घटनेमुळे परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात आहे.

COMMENTS