Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

परळीत सरपंचाची गोळ्या झाडून हत्या

बीड ः लोकसभा निवडणुकीपासून बीड काही प्रमाणात अशांत असून, याठिकाणी मराठा-ओबीसी संघर्ष सुरू असतांनाच जिल्ह्यातील परळीमधील मरळवाडी येथील सरपंचाची गो

iPhone विकत घेण्यासाठी आईने 8 महिन्याच्या मुलाला विकलं ?
हाय मेहेंगाई, मोठा झटका! जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीत 10 टक्के वाढ | LOKNews24
शीतल वाली यांनी स्वीकारला वरिष्ठ वित्त विभागीय व्यवस्थापक म्हणून पदभार

बीड ः लोकसभा निवडणुकीपासून बीड काही प्रमाणात अशांत असून, याठिकाणी मराठा-ओबीसी संघर्ष सुरू असतांनाच जिल्ह्यातील परळीमधील मरळवाडी येथील सरपंचाची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्यामुळे खळबळ उडाली आहे. परळी शहरातील बँक कॉलनी परिसरात शनिवारी रात्री अज्ञातांनी गोळीबार केला. यामध्ये सरपंचाचा जागीच मृत्यू झाला. तर नंदागौळ येथील ग्यानबा मारोती गित्ते जखमी आणि महादेव गीते हे दोघे गोळीबारात गंभीर जखमी झाले आहेत.
यासंदर्भात आलेल्या माहितीनुसार शरदचंद्र पवार पक्षाचे नेते बबन गित्ते यांच्यासह पाच जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आर्थिक देवाणघेवाणीतून हा गोळीबार झाल्याचे ’एफआयआर’मध्ये नमूद करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या सर्व आरोपींनी बापूराव आंधळे व ग्यानबा गीते यांना परळी येथील महादेव गीते यांच्या घरी बोलवले होते. त्या ठिकाणी बबन गित्ते यांनी पैसे आणलेस का? असे म्हणत बापूराव आंधळे यांना शिवीगाळ केली. बापूराव आंधळे यांनी शिवी देऊ नको असे म्हणताच बबन गित्ते यांनी कमरेचे पिस्तूल काढून आंधळे यांच्या डोक्यात गोळी मारली तसेच राजाभाऊ नेरकर यांनी कोयत्याने मारहाण केली. महादेव गीते याने ग्यानबा गीते यांना गोळी मारली. परंतु ती त्यांच्या छातीला चाटून गेल्याने ते जखमी झाले. दरम्यान, शरद पवार गटाचे नेते बबन गीते यांच्या पॅनलमधून बापू आंधळे यांनी निवडणूक लढवली होती. मरळवाडी ग्रामपंचायतमध्ये आंधळे सरपंच झाले होते. त्यानंतर त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. परळीमधील बँक कॉलनी परिसरात ही घटना घडली आहे. पोलिसांनी आंधळेंचा मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवला आहे. या घटनेनंतर रात्री उशिरा बीडचे पोलिस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी घटनास्थळाला भेट दिली आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर रात्रीपासूनच परळीत मोठा पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला.

COMMENTS