Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बीड जिल्ह्यात सरपंचाचे अपहरण करून हत्या; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको

बीड : पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगच

पूजा खेडकरला 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
सरपंचांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यासाठी मुदतवाढ
आता पाचवी-आठवीत उत्तीर्ण होणे बंधनकारक

बीड : पुण्यात आमदार योगेश टिळेकर यांचे मामा सतीश वाघ यांचे अपहरण करून हत्या केल्याची घटना ताजी असतांनाच बीड जिल्ह्यातील केज तालुक्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांचे काही जणांनी अपहरण करत त्यांची हत्या केली आहे. त्यांचा मृतदेह दैठणा गावाच्या जवळ (ता. केज) आढळल्याने खळबळ उडाली आहे. संतोष देशमुख असे हत्या झालेल्या सरपंचाचे नाव असून त्यांचे येथील टोलनाक्याजवळून अपहरण झाले होते.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष देशमुख हे त्यांच्या कारमधून त्यांचा मामेभाऊ शिवराज लिंबराज देशमुख यांच्यासोबत मस्साजोगकडे जात होते. यावेळी डोणगाव टोलनाका येथे त्यांची कार काही अज्ञात व्यक्तिंनी अडवली. त्यांना त्यांच्या कारमधून उतरवत आरोपींनी बेदम मारहाण केली. यानंतर अपहरणकर्त्यांनी देशमुख यांच्या गाडीची तोडफोड केली. यानंतर संतोष देशमुख यांना आरोपींनी त्यांच्या कारमध्ये बसवत केजच्या दिशेने निघून गेले. या प्रकरणी देशमुख यांच्या सोबत आलेल्या मामेभावाने पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तातडीने या घटनेप्रकरणी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला. अपहरणकर्त्यांनी सरपंचांना केजकडे नेले असल्याचे मामेभाऊ शिवरज देशमुख यांनी सांगितले. त्यानुसार पोलिसांनी तपास सुरू केला. पोलिसांनी तपास पथके केजच्या दिशेने रवाना केली. मात्र, देशमुख यांचा मृतदेह हा थोड्या वेळाने दैठणा गावाच्या रस्त्यावर आढळला. पोलिसांनी संतोष देशमुख यांच्या मृत्यूमागे घातपाताची शक्यता वर्तवली आहे. केज पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत.

दोन आरोपींना घेतले ताब्यात
सरपंच संतोष पंडीतराव देशमुख यांच्या हत्येप्रकरणी आरोपींना अटक होत नसल्याने केज तालुक्यातील ग्रामस्थात प्रचंड रोष आहे. केज शहरात आणि मस्साजोग येथे रास्ता रोको आंदोलन सुरु आहे. या पार्श्‍वभूमीवर अपर पोलीस अधीक्षक पांडकर, चेतना तिडके यांनी घटनास्थळी धाव घेऊन पोलीस निरीक्षक उस्मान शेख, प्रशांत महाजन यांना आदेशित करून आरोपींच्या शोधासाठी तात्काळ पथके रवाना केली आहेत.सदरील आरोपींचा वाशी, धाराशिव परीसरात शोध घेत असतांना मिळालेल्या माहीतीच्या आधारे पोलिसांनी जयराम माणिक चाटे (रा. तांबवा ता.केज) आणि महेश सखाराम केदार (रा. मैंदवाडी ता.धारुर) या दोन आरोपींना ताब्यात घेतले आहे.

COMMENTS