सरोदे परिवाराकडून भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन यात्रा

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सरोदे परिवाराकडून भाविकांना आषाढी एकादशी निमित्त विठ्ठल दर्शन यात्रा

अहिल्यानगर /धाकली पंढरी नांदूर विठ्ठलाचे येथे चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांनी चिचोंडी पाटील ते नांदूर विठ्ठलाचे (कपारीचा विठोबा) य

पवारांनीच महाराष्ट्रातील घरं फोडली  
शरद पवार ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल
द्राक्षांच्या बागेवरील प्लास्टिकसाठी 50 टक्के अनुदान द्यावे ः खा. शरद पवार

अहिल्यानगर /
धाकली पंढरी नांदूर विठ्ठलाचे येथे चिचोंडी पाटील येथील कौसाबाई मारुती सरोदे यांनी चिचोंडी पाटील ते नांदूर विठ्ठलाचे (कपारीचा विठोबा) या विठ्ठल दर्शनासाठी दोन मोफत बस 12 वर्षाच्या एका तपानंतर न्याय मिळाल्याबद्दल ग्रामस्थ बंधू भगिनींसाठी ठेवल्या होत्या.

या विठ्ठलदर्शन सेवेचा शुभारंभ सकाळी स्वतः कौसाबाई मारुती सरोदे,सरपंच शरदभाऊ पवार,पदाधिकारी व ज्येष्ठ नागरिक संघ व उपस्थित भाविकांच्या हस्ते केला. सर्व भाविकांनी ज्ञानोबा- माउली तुकाराम जयघोष करत,दिवसभर 1500 विठ्ठल भक्तांनी सकाळी आठ ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत या सेवेचा लाभ घेतला घेतला.

सरोदे परिवार यांनी या अनोख्या विठ्ठल दर्शन यात्रेचे आयोजन केल्याबद्दल व त्यांची मनोकामना पूर्ण झाल्याबद्दल चोरीला गेलेली 51 गुंठे जमीन बारा वर्षाच्या न्यायाच्या प्रतीक्षेनंतर परत मिळाल्याबद्दल व सामाजिक बांधिलकी ठेवत भक्ती आणि समाजसेवेचे हे उत्तम उदाहरण आहे. गावातील भाविकांसाठी हे विठ्ठल दर्शन यात्रा अध्यात्मिक पर्वणी ठरली आहे असे सरपंच शरदभाऊ पवार यांनी बोलताना सांगितले व सरोदे परिवाराचे अभिनंदन करून विठ्ठलदर्शन यात्रेचे हरीओम मित्र परिवारातील सर्व स्वयंसेवकांचे आभार मानले,व सर्वांना पुढील कार्यास व आषाढी एकादशीच्या शुभेच्छा दिल्या.

COMMENTS