केज प्रतिनिधी - माऊली विद्यापीठ केज संचलित सरस्वती कन्या प्रशाला या शाळेतील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेली कुमारी चटप प्रांजली हिने किनवट जि.नांदे

केज प्रतिनिधी – माऊली विद्यापीठ केज संचलित सरस्वती कन्या प्रशाला या शाळेतील इयत्ता नववी मध्ये शिकत असलेली कुमारी चटप प्रांजली हिने किनवट जि.नांदेड येथे सातव्या राज्यस्तरीय कराटे स्पर्धेमध्ये महाराष्ट्रात द्वितीय क्रमांक पटकावला आहे, तिला या स्पर्धेमध्ये रोप्य पदक प्राप्त झाले असून तिची राष्ट्रीय स्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
याअगोदरही प्रांजलीने तवायकांदो स्पर्धेमध्ये राज्यस्तरावर बाजी मारली होती, तिने मिळवलेल्या या यशाबद्दल कन्या प्रशालेच्या प्राचार्या घुले मॅडम यांनी तिचा पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला. तसेच माऊली विद्यापीठाचे प्रशासकीय अधिकारी मोरे सर सचिव आदित्य दादा पाटील यांनीही तिचे अभिनंदन केले आहे. शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी तिला पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या आहेत ,यावेळी निकालासाठी उपस्थित असलेल्या सर्व विद्यार्थिनी सर्व शिक्षक व कर्मचारी वृंद व इतर मान्यवर उपस्थित होते.
COMMENTS