लातूर प्रतिनिधी - येथील स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीतील सराईत आरोपींकडून चोरीस गेलेले इलेक्ट्रिकल साहित्यासह 1 लाख 99
लातूर प्रतिनिधी – येथील स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी घरफोडीतील सराईत आरोपींकडून चोरीस गेलेले इलेक्ट्रिकल साहित्यासह 1 लाख 99 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील एका आरोपीस अटक करण्यात आली आहे. दि. 22 जून ते 23 जूनच्या मध्यरात्री स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गरुड चौक परिसरात असलेल्या एका इलेक्ट्रिक दुकानाचे गोडाऊन फोडून अज्ञात चोरट्याने प्रवेश करुन गोडाऊनमधील 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे इलेक्ट्रिकल साहित्य चोरुन नेले तक्रारीवरुन स्वामी विवेकानंद चौक पोलीस ठाणे येथे गुरनं 390/2023 कलम 454,457, 380 भादवी प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता.
सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याचे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी निर्देशित करुन महत्त्वाच्या सूचना दिल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक सोमय मुंडे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी लातूर शहर भागवत फुंदे यांचे मार्गदर्शनात पोलीस ठाणे विवेकानंद चौकचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांच्या नेतृत्वात पोलीस पथक नेमुन तपासा बाबत सूचना देण्यात आले होते. तपासादरम्यान पोलीस पथकाला मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावरुन आरोपी प्रशांत अशोक गाडेकर वय 33 वर्ष राहणार भादा तालुका औसा सध्या राहणार गरुड चौक लातूर याला दि. 30 जून रोजी ताब्यात घेऊन त्यांचेकडे गुन्ह्याबाबत विचारपूस केले असता, त्यांने त्याचा आणखीन एक साथीदाराच्या मदतीने इलेक्ट्रिकल साहित्याची दुकानांमध्ये चोरी करुन इलेक्ट्रिकल साहित्य चोरल्याचे कबुली देऊन गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विविध इलेक्ट्रिकल साहित्य व लोखंडी केबल असा एकूण 1 लाख 99 हजार 500 रुपये किमतीचे लपून ठेवलेले साहित्य काढून दिल्याने ते जप्त करण्यात आले आहे. सदर गुन्हा उघडकीस आणण्यासाठी वरिष्ठांचे मार्गदर्शनात पोलीस निरिक्षक सुधाकर बावकर यांचे नेतृत्वातील टीम मधील सहाय्यक पोलीस निरीक्षक रामचंद्र केदार, पोलीस उपनिरीक्षक महेश गळगटे, पोलीस अमलदार वाजीद चिखले, कोकणे, बेरळीकर , रमेश नामदास यांनी गुन्ह्याचा कौशल्यपूर्ण तपास करून गुन्ह्याची उकल करून गुन्हा उघडकीस आणून, गुन्ह्यात चोरलेला इलेक्ट्रिकल साहित्याचा मुद्देमाल शंभर टक्के हस्तगत करण्याची कामगिरी बजावली आहे.
COMMENTS