Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले

पुणे प्रतिनिधी - पुणे शहरात सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले पुणे शहरात दिवाळी सणाचा उत्सवाची तयारी सुरु असताना गुन्हेगारी वाढली आहे. द

शिर्डी शहराचे रूपडे बदलणार
दूध दरवाढीसाठी कर्जत तहसीलसमोर शेतकर्‍यांचे आंदोलन
डॉ.सुजय विखे यांना धमकी देणार्‍यांवर कारवाई करा

पुणे प्रतिनिधी – पुणे शहरात सराफावर सहा गोळ्या झाडून दागिने लुटले पुणे शहरात दिवाळी सणाचा उत्सवाची तयारी सुरु असताना गुन्हेगारी वाढली आहे. दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातली होती. आता त्यानंतर भररस्त्यात सराफावर सहा गोळ्या झाडण्यात आल्या. हल्लेखोरांनी गोळीबार करुन त्यांच्याकडील दागिने लुटून नेले. या घटनेमुळे पुणे शहरातील गुन्हेगारीवर चिंता व्यक्त होऊ लागली आहे. पुणे शहरातील गुन्हेगारीचा विषय अधूनमधून चर्चेत येत असतो. पुण्यात कोयता गँगचा धुमाकूळ सुरु असतो. पुणे पोलिसांनी कोयता गँगच्या मुसक्या आवरण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या. त्यानंतर दोन दिवसांपूर्वी कोयता गँगने धुमाकूळ घातला. आता बुधवारी रात्री दुकान बंद करुन घरी जाणाऱ्या सराफावर भररस्त्यात गोळीबार करण्यात आला. गोळीबाराच्या या घटनेत सराफ व्यावसायिक प्रतिक मदनलाल ओसवाल( वय 35) गंभीर जखमी झाले आहेत. हल्लेखोरांनी त्यांच्यावर सहा गोळ्या झाळत त्यांच्याकडून सोने चांदीची बॅग पळवून नेली. त्यानंतर आरोपी फरार झाले. या घटनेमुळे पुणे शहर हादरले आहे.

COMMENTS