Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संतोष देशमुख खून प्रकरण : सीआयडीकडून 1400 पानांचे दोषारोपपत्र

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत. संतोष देशमुख या

राज्यात पुन्हा ‘ऑपरेशन लोटस’ !
अध्यादेश कायदेशीर प्रक्रियेत अडकणार
’मविआ’ने त्यांचा मसुदा आम्हाला दाखवावा

बीड : सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत. संतोष देशमुख यांच्या खून प्रकरणाबरोबरच अवादा कंपनीस मागितलेले खंडणी तसेच सुरक्षारक्षक सोनवणे यांना झालेल्या मारहाण प्रकरणातील अ‍ॅट्रॉसिटी या तिन्ही प्रकरणांचे चौदाशे पानांचे दोषारोपपत्र मकोका न्यायालयात गुरूवारी दाखल करण्यात आले.
एसआयटीचे प्रमुख बसवराज तेली, तपास अधिकारी किरण पाटील तसेच खंडणी प्रकरणाचे तपास अधिकारी अनिल गुजर पाटील यांनी गुरूवारी दुपारी बीडच्या न्यायालयामध्ये दाखल होत संतोष देशमुख खून प्रकरणाचे चार्जशीट दाखल केले. यावेळी सरकारी वकील बाळासाहेब कोल्हे उपस्थित होते.या आरोप पत्रात मोठे गौप्यस्फोट होणार असल्याची माहिती आहे. दि. 9 डिसेंबर रोजी संतोष देशमुख यांची डोणगाव टोलनाक्यावरून अपहरण करून हत्या करण्यात आली होती. या प्रकरणात आतापर्यंत नऊपैकी आठ आरोपींना अटक करण्यात आली आहे. एक आरोपी कृष्णा आंधळे अद्यापही फरार आहे.

COMMENTS