Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पत्रकार संघाच्या पारनेर तालुकध्यक्षपदी संतोष तांबे

उपाध्यक्षपदी वसंत रांधवण यांची निवड

सुपा ः महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारीणीची निवड शुक्रवारी शासकीय विश्रामगृह पारनेर येथे करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्

गुहा येथे कार व बसची समोरासमोर धडक ; चार ठार
पिसाळलेल्या कुञ्याने चाव्यानेे आठ गायींसह शेळीचा मृत्यू
टल्ली लोक चालतात, तल्लीन भक्त नाहीत?; राज्यभर मंदिरे उघडण्यासाठी भाजपचे आंदोलन

सुपा ः महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाची पारनेर तालुका कार्यकारीणीची निवड शुक्रवारी शासकीय विश्रामगृह पारनेर येथे करण्यात आली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ पारनेरची बैठक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी संघटनेच्या विविध पदांसह कार्यकारीणी जाहीर करण्यात आली.तालुकाध्यक्ष संतोष तांबे यांनी ही कार्यकारीणी जाहीर केली. त्यानंतर जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांचे हस्ते पदाधिकार्‍यांना निवडीची पत्रे देण्यात आली. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून, जिल्हासचिव सुरेश खोसे उपस्थित होते.
यावेळी संघटनात्मक बांधणीसाठी सर्व पदाधिकार्‍यांनी वेळ द्यावा आणि प्रामाणिक, सर्वसमावेश्यक बातमीदारी करुन समाजातील प्रत्येक घटकाला न्याय द्यावा. योग्यवेळी तळागाळातील पत्रकाराला संकटकाळामधे संघटनेची मदत तत्काळ व्हायला हवी. पत्रकारांचे सुखदु:खात सर्व पदाधिकार्यांनी हजर राहून त्यांना मदत केली पाहिजे. पत्रकारांसाठी विविध कार्यक्रम राबवुन आपल्या कामाची चुनुक प्रत्येकाने दाखविली पाहीजे असे आवाहन जिल्हाध्यक्ष दत्ता गाडगे यांनी केले. पारनेर तालुका कार्यकारिणीमध्ये संतोष तांबे अध्यक्ष, संतोष कोरडे-सचिव,  वसंत रांधवण-उपाध्यक्ष, विशाल फटांगडे-उपाध्यक्ष, ठकसेन गायखे उपाध्यक्ष, नितीन परंडवाल-खजिनदार, महेश शिंगोटे-इलेक्ट्रॉनिक मिडीयाप्रमुख,  चंद्रकांत कदम-प्रसिध्दीप्रमुख, सुदाम दरेकर-संपर्कप्रमुख,  सचिन जाधव-निघोज शहरप्रमुख,  अ‍ॅड. सोमनाथ गोपाळे-सहसचिव,  सर्वश्री सदस्यांमध्ये गंगाधर धावडे, रामदास नरड, सुधिर पठारे, सदानंद सोनावळे, संपत वैरागर, संदिप गाडे, भगवान श्रीमंदिलकर, भगवान गायकवाड , प्रविण वराळ, मार्गदर्शकांमध्ये वसंत मुंडे-प्रदेशाध्यक्ष, संजय भोकरे-प्रदेश संघटक, डॉ. विश्‍वासराव आरोटे-प्रदेश सचिव, दत्ता गाडगे-जिल्हाध्यक्ष, सुरेश खोसे -जिल्हासचिव, रामचंद्र सुपेकर-पत्रकार यांचा समावेश आहे.

COMMENTS