Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत निरंकारी मिशनतर्फे आंतरराष्ट्रीय योग दिवस उत्साहात

अहमदनगर ः संत निरंकारी मिशनच्यावतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरातील विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली मोठ

शकुर पैलवान चुडीवाला स्मृतीप्रित्यर्थ किरण काळे यांच्याकडे मानाची गदा सुपूर्द
पुणतांबा रेल्वे स्थानकावर जलद गाडयांना थांबा मिळावा ः संध्या थोरात
डॉ.के.पी.उबाळे यांच्या पुण्यस्मरण निमित्त अभिवादन

अहमदनगर ः संत निरंकारी मिशनच्यावतीने 21 जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिवस देशभरातील विविध शाखांमध्ये स्थानिक योग प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनखाली मोठ्या उत्साहात योगाभ्यास केला गेला. मंडळाच्या नगर शाखेच्यावतीने सुद्धा मिस्कीन रोड स्थित संत निरंकारी सत्संग भवनच्या प्रांगणात सकाळी 7 ते 8 या वेळेत योग विद्याधामचे योग प्रा. बबनराव बारगळ व योगशिक्षक गणेश येनगंदूल यांच्या मार्गदर्शनाखाली जवळपास 50 योगप्रेमींनी योगासने-प्राणायाम करीत योग दिवस साजरा केला. असाच कार्यक्रम नगर झोन अंतर्गत येणार्या सर्व शाखांमध्ये योग दिवस साजरे केले गेले. याप्रसंगी योगाचे दैनंदिन जीवनातील  महत्व व उपयुक्तता व्याख्यांनाद्वारे साधकांपुढे मांडण्यात आली.
संयुक्त राष्ट्र संघाच्या आंतरराष्ट्रीय योग दिवस कार्यक्रमात 2015 पासून निरंकरी मिशनची सामाजिक शाखा संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन विशाल स्वरुपात सहभागी होऊन योग दिवस साजरा करीत आहे. योग ही एक अशी प्राचिन पद्धत आहे, ज्याद्वारे आध्यात्मिक, शारीरिक, मानसिक आणि आत्मिक स्वास्थ्य संतुलित केले जाते. योगाच्या नियमित अभ्यासाने तणावमुक्त जीवन जगता येते. सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांनी ही आपल्या विचारांमध्ये ‘स्वस्थ मन, सहज जीवन’ अवलंबविण्या विषयी मार्गदर्शन करताना समजावले, आहे की आपण आपले शरीर ही ईश्‍वर प्रदत्त अमुल्य देणगी समजून ते स्वस्थ व निरोगी ठेवले पाहिजे. थोडक्यात अशा स्वास्थ्यवर्धक कार्यक्रमांचा उद्देश केवळ हाच आहे की, धावपळीच्या जीवनात आपल्या प्रकृतीकडे अधिक लक्ष देऊन ती अधिकाधिक उत्तम ठेवून एक स्वस्थ जीवन जगायचे आहे.

COMMENTS