Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संत कक्कया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे

महामंडळासाठी 28 जून रोजी आझाद मैदानावर राज्यव्यापी आंदोलन

मुंबई ः संत ककया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे व इतर खालील मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार 28 जून 2024 रोजी आझाद मैदान येथे समाज

उसने पैसे मागितले म्हणून शिक्षिकेला जिवंत जाळलं.
ब्रिटनमध्ये आर्थिक मंदीचे संकट
हेलिकॉप्टर कोसळून जवान शहीद

मुंबई ः संत ककया आर्थिक विकास महामंडळ जाहीर करावे व इतर खालील मागण्यासाठी शासनाचे लक्ष वेधण्यासाठी शुक्रवार 28 जून 2024 रोजी आझाद मैदान येथे समाज बांधवांकडून राज्यव्यापी धरणे आंदोलने करण्यात येणार आहेत. या वंचित समाजाला आंदोलन करण्याची वेळ न येऊ देता आपण मंडळाचे पदाधिकारी समवेत बैठक आयोजित करुन सदर मागण्या संदर्भात ढोर ककया समाजाला न्याय देण्यात यावा अशी मागणी वीरशैव कक्कया कल्याण मंडळ मुंबई यांच्याकडून करण्यात आली आहे. वीरशैव ककया ढोर समाजाला स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ द्यावे व इतर खालील मागण्यासाठी उपरोक्त मंडळाच्या वतीने शासन स्तरावर सातत्याने पाठपुरावा केला आहे. संत ककया आर्थिक विकास महामंडळाचा प्रस्ताव शासनाकडे प्रलंबित असल्याने व इतर मागण्यांसाठी शासनाने निर्णय न घेतल्याकारणाने ढोर कक्कया समाजामध्ये असंतोषाची भावना आहे. त्यामुळे महामंडळाची लवकरात लवकर घोषणा करावी, तसेच ढोर कक्कया समाजाची स्वतंत्र जनगणना करावी, कक्कया ढोर जातीचा दाखला देताना इ.सन.1950चा पुरावा अन्य राज्यांचा ग्राह्य धरण्यात यावा व ज्या ठिकाणी 15 वर्षांचे वास्तव आहे अशा व्यक्तिंना व त्यांच्या कुटुंबीयांना रहात असलेल्या ठिकाणी या, जिल्हा विकारी यांनी जातीचा दाखला द्यावा, महानगरपालिका,नगरपालिका, ग्रामपंचायत हद्दीत व्यवसाय करण्यासाठी गाळे उपलब्ध करून द्यावे,                                        

सरकारी विभागांत चर्म वस्तू विक्रीसाठी टेंडर मध्ये ढोर समाज व्यक्तींसाठी स्वतंत्र आरक्षण द्यावे, प्लास्टिकच्या जगात चर्म उद्योगात नाविन्य वस्तू बनविणे साठी प्रशिक्षण केंद्राची स्थापना करावी, प्रत्येक जिल्ह्यात समाजासाठी एक समाज मंदिर हॉल बांधून द्यावे. अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.
वीरशैव ककया कल्याण मंडळ मुंबई यांच्यावतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, महाराष्ट्रात आपला कक्कया ढोर समाज विविध जिल्हा, तालुका व खेडेगावात विखुरलेला आहे. आपला समाज कातडी कमवणारा असा एकमेव समाज आहे जो अनुसूचित जातीमध्ये मोडत आहे. देश स्वातंत्र झाल्यानंतर आपल्या समाजाबरोबर चर्मकार म्हणून चांभार व होलार या जातीतील लोकांना कातडी रंगवणे व त्यापासून विविध वस्तू तयार करण्यासाठी शासनाने लिडकॉम संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ मर्यादित स्थापन करण्यात आले. या महामंडळास आतापर्यंत हजारो कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आले परंतु या पैशातून आपल्या ढोर समाजातील घटकांना कर्ज रुपात काहीच आर्थिक वाटा मिळाला नाही. ढोर समाजाचा कातडी कमावणे हा मुळ व्यवसाय जागतिकीकरणामुळे बंद झाला. आणि आपल्या समाजातील बरेच लोक उदरनिर्वाहासाठी नोकरी, व्यवसायसाठी शहरात आले. त्यापैकी खेडेगावात विखुरलेला काही समाज शेती व मोल मजुरी करु लागला आजही त्याची परिस्थिती हलाखीची आहे. त्याला कर्ज मिळत नसल्याने तो सरकारी लाभापासून वंचित त्यामुळे या समाजासाठी स्वतंत्र महामंडळ स्थापन करण्याची मागणी करण्यात आली आहे.

महामंडळासाठी सरकारी दरबारी पाठपुरावा – वीरशैव कक्कया कल्याण मंडळाचे पदाधिकार्‍यांनी यांनी वेळोवेळी महामंडळ निर्माण व्हावे यासाठी सरकार दरबारी पाठपुरावा केला. यामध्ये मा. आमदार ज्ञानराज चौगुले यांनी मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे जाऊन संत कक्कया ढोर समाजाचे स्वतंत्र महामंडळ देण्याचा आग्रह धरला. यावर मा. मुख्यमंत्री महोदयाने  सचिव, सामाजिक न्याय विभागाकडे प्रस्ताव सादर करण्याचे आदेश देण्यात आले. या विषयी सातत्याने वीरशैव कक्कया कल्याण मंडळाच्या पदाधिकार्‍यांनी जाऊन चौगुले यांच्या नेतृत्त्वाखाली सचिव महोदयाकडे महामंडळाचा प्रस्ताव सादर करण्याचा आग्रह धरला, मात्र तरीही महामंडळाची मागणी पूर्ण होत नसल्यामुळे राज्यव्यापी आंदोलन सुरू करण्यात येत असल्याचा इशारा वीरशैव कक्कया कल्याण मंडळाकडून देण्यात आला आहे. 

COMMENTS