Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्वधर्मिय सामुदायिक विवाह सोहळा उत्साहात

कोपरगाव तालुका ः संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्व धर्मिय सामुदायिक विवाह स

व्याधिमुक्त रुग्णांसाठी स्नेहदीपतर्फे परिचर्या
के.जे.सोमैया महाविद्यालयात महिला तक्रार निवारण कक्षाचे उद्घाटन
सुरेश जोशी यांचा सहस्रचंद्रदर्शन सोहळा गुळ तुला करून साजरा

कोपरगाव तालुका ः संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष विवेक भैय्या कोल्हे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आलेला सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा साधु, संत, महंत यांच्या आशिर्वादाने आणि विविध क्षेत्रातील मान्यवर यांच्या उपस्थितीत नववध-वरांना लग्न बंधनाची रेशीम गाठ बांधत मोठ्या दिमाखात आणि उत्साहात हा विवाह सोहळा पार पडला.
कोपरगाव शहरातील तहसील कार्यालाजवळील मैदानावर  संजीवनी युवा प्रतिष्ठानचा सर्व धर्मिय सामुदायिक विवाह सोहळा संत महंत आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा देखणा सोहळा पार पडला. या प्रसंगी महंत काशिकानंद महाराज, महंत कैलासगिरीनंद महाराज, महानुभाव पंथाचे अनंत महाराज, भन्तेजी मदन कश्यप, महंत विकासगिरी महाराज, महंत राघवेन्द्रनंद महाराज, मेथडीष्ट चर्चचे फादर भोसले, ह.भ.प.चांदगुडे महाराज, ह.भ.प. मोरे महाराज, मौलाना हाफिज बशीर, मौलाना आसिफ, मौलाना नसीर, हाजी रियाज , खा.  सदाशिव लोखंडे, माजी खासदार  भाऊसाहेब वाकचौरे, संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीनदादा शंकरराव कोल्हे, माजी आमदार स्नेहलता कोल्हे, दत्तू नाना कोल्हे, संजीवनी एज्युकेशनचे मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे,  प्रणवदादा पवार, संजीवनी युवा प्रतिष्ठाणचे अध्यक्ष  विवेक कोल्हे,  इशान कोल्हे, मनाली कोल्हे, रेणूका कोल्हे, सौ.श्रद्धा कोल्हे यासह आजी माजी नगरसेवक, पदाधिकारी, कार्यकर्ते, युवा सेवक व वर्‍हाडी मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.  संजीवनी युवा प्रतिष्ठानने आयोजित केलेल्या विवाह सोहळ्याची सुरवात शहरातील समता पतसंस्थेजवळील श्री हनुमानाचे दर्शन घेत करण्यात आली. येथून नवरदेवांची मिरवणूक निघाली. तीन सुवर्ण रथात नवरदेव विवाहस्थळी निघाले. तत्पूर्वी नव वधू- वरांना पेहरावाचे वस्त्र भेट म्हणून देण्यात आले. वधूसाठी सौन्दर्य करून देणारे सेवक पाचारण करण्यात आले होते.सवाद्य निघालेले मिरवणुकीत घोडे, डीजेची व्यवस्था करण्यात आली होती. प्रतिष्ठानचे कार्यकर्ते यांनी हिरीरीने सहभाग घेत फटाक्यांची आतिषबाजीने परिसर गजबजून गेला होता. विवाह स्थळी येताच नवं वधू आणि वरांचे जंगी स्वागत करण्यात आले. सर्व धर्मियांचे पौरोहित्य करणार्‍या गुरूंना या सोहळ्यात आमंत्रित करून त्यांच्याकडून शासरोक्त पद्धतीने वैवाहिक लग्न गाठ बांधण्यात आली. वर्‍हाडी मंडळी स्वादिष्ट अशा पंचपक्वांनाची व्यवस्था करण्यात आली होती.असा हा आगळा वेगळा सोहळा याची देही याची डोळा पाहून सर्वच थक्क झाले होते. रितिरिवाजाप्रमाणे कोल्हे परिवाराने उपस्थित नववधूचे कन्यादान देखील केले. आनंदाचा लग्न सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

युवकांच्या साथीने देखणा विवाह सोहळा साध्य : विवेक कोल्हे – कोणतेही सामाजिक कार्य करतांना आपल्या विचारांच्या पाठीशी जे बळ हवं असते, ते बळ युवक कार्यकर्त्यांकडून मिळाल. त्याच प्रेरणेने आणखी पुढे जात जात हा असा दिमाखदार सोहळा न भूतो ना भविष्यती अनुभवता आला. ही ताकत युवकांची आहेच, विचारांचा वारसा हा स्व. शंकररावजी कोल्हे यांच्याकडून मिळाला. त्या विचाराला ऊर्जा देण्यात संजीवनी उद्योग समूहाचे अध्यक्ष बिपीन दादा कोल्हे, आणि कोपरगाव मतदार संघाच्या प्रथम महिला आमदार सौ. स्नेहलता बिपीनदादा कोल्हे यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. यामुळेच देखणा असा विवाह सोहळा साध्य झाल्याची भावना संजीवनी युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष  विवेक  कोल्हे यांनी व्यक्त केली.

COMMENTS