Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या पाच विद्यार्थ्यांना डेलाॅईट कंपनीत नोकरी

कोपरगाव : जगभरातील कंपन्यात स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या डेलाॅईट या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन देऊन नोकरीची संधी दिली. या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना हि संधी मिळाली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.  संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. संजीवनीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सार्थक सतीश चौधरी,आदित्य अनिल पानगव्हाणे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या उत्कर्ष सुनील जाधव, चेतन बाबासाहेब वाकळे व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर  इंजिनिअरिंगच्या जान्हवी आनंद बारबिंड यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले. मी धामणगाव फाटा येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डीप्लोमा अन्य  एका पॉलिटेक्निकमधून केला. त्यावेळी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्लेसमेंटच्या सातत्याबद्दल माहिती होती. त्यामुळे संजीवनी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. संजीवनीला ऑटोनॉमस दर्जा असल्याने  डीग्री बरोबरच ऑनर डीग्रीदेखील प्राप्त करता येते. त्यासाठी वैकल्पिक विषय निवडावे लागतात.  मी सायबर सिक्युरीटी हा विषय निवडला. त्याचा फायदा मला जगातील टॉपच्या डेलॉईट कंपनीत माझी निवड झाली.   – सार्थक चौधरी, विद्यार्थी  

नागरी सहकारी पतसंस्थांसाठी अर्थसंकल्प दिलासादायक : कोयटे
कोपरगाव शहर राष्ट्रवादी कार्यकारणीत नव्यांना संधी : आ. काळे
सडे गाव ते सडे फाटा रस्ता डांबरीकरण पूर्ण

कोपरगाव : जगभरातील कंपन्यात स्वतःचे वेगळे स्थान असलेल्या डेलाॅईट या कंपनीने संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या पाच विद्यार्थ्यांना आकर्षक वेतन देऊन नोकरीची संधी दिली. या कंपनीचे मुख्यालय लंडन येथे आहे. संजीवनी इंजिनिअरींग काॅलेजच्या ट्रेनिंग प्लेसमेंट विभागाच्या पुढाकारामुळे या विद्यार्थ्यांना हि संधी मिळाली. त्यात संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या कॉम्प्युटर इंजिनिअरींग, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर इंजिनिअरींगच्या अंतिम सत्राची परीक्षा देणाऱ्या पाच विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

 संजीवनी इंजिनिअरींग कॉलेजच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभागाच्या प्रयत्नातून या कॅम्पस प्लेसमेंट ड्राईव्हचे आयोजन करण्यात आले. या कंपनीच्या मानव संसाधन विभागाच्या प्रतिनिधींनी विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेतल्या. संजीवनीच्या कॉम्प्युटर इंजिनिअरिंगच्या सार्थक सतीश चौधरी,आदित्य अनिल पानगव्हाणे, इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विभागाच्या उत्कर्ष सुनील जाधव, चेतन बाबासाहेब वाकळे व इलेक्ट्रॉनिक्स अँड कॉम्प्युटर  इंजिनिअरिंगच्या जान्हवी आनंद बारबिंड यांची नोकरीसाठी निवड करण्यात आली. संजीवनीचे अध्यक्ष नितिन कोल्हे व मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व निवड झालेल्या अभियंत्यांचे अभिनंदन केले.

मी धामणगाव फाटा येथील शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे. मी कॉम्प्युटर टेक्नॉलॉजीचा डीप्लोमा अन्य  एका पॉलिटेक्निकमधून केला. त्यावेळी संजीवनी इंजिनिअरिंग कॉलेजच्या प्लेसमेंटच्या सातत्याबद्दल माहिती होती. त्यामुळे संजीवनी इंजिनिअरिंगमध्ये प्रवेश घेतला. संजीवनीला ऑटोनॉमस दर्जा असल्याने  डीग्री बरोबरच ऑनर डीग्रीदेखील प्राप्त करता येते. त्यासाठी वैकल्पिक विषय निवडावे लागतात.  मी सायबर सिक्युरीटी हा विषय निवडला. त्याचा फायदा मला जगातील टॉपच्या डेलॉईट कंपनीत माझी निवड झाली. 

 – सार्थक चौधरी, विद्यार्थी  

COMMENTS