Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीच्या 100 टक्के निकालाची  परंपरा कायम

कोपरगाव तालुका ः  महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रवारी मार्च मध्ये घेतलेल्या इ. 12 वीच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून

रेमडेसिविर च्या वापरामुळे अनेक रुग्णांवर झाले दुष्परिणाम | पहा १२ च्या १२ बातम्या | LokNews24
नगरच्या डॉक्टरांचे जामीन अर्ज फेटाळले
महाराजा होळकरांचे कार्य समाजासाठी स्फूर्तिदायक ः विवेक कोल्हे

कोपरगाव तालुका ः  महाराष्ट्र  राज्य उच्च माध्यमिक मंडळाने फेब्रवारी मार्च मध्ये घेतलेल्या इ. 12 वीच्या परीक्षांचे निकाल मंगळवारी जाहीर झाले असून यात संजीवनी ज्युनिअर कॉलेजच्या सायन्स व कॉमर्स विभागांचा निकाल 100 टक्के लागला असून सलग 9 व्या  वर्षीही 100 टक्के  निकालाची परंपरा कॉलेजने राखली आहे. कॉमर्स विभागात तनुजा संजय आंग्रे हीने 95 टक्के गुण मिळवुन कोपरगाव तालुक्यात सर्व प्रथम क्रमांकाने उत्तिर्ण होण्याचा बहुमान पटकाविला तर सायन्स विभागात अंजली सतीश चोळके हीने 92. 33 टक्के गुण मिळवुन प्रथम क्रमांक मिळविला, अशी  माहिती संजीवनी ज्युनिअर कॉलेजने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.

      पत्रकात पुढे म्हटले आहे की कॉमर्स विभागात अस्मिता केदारनाथ काब्रा हीने 93.33 टक्के तर उत्सवी संदीप देवकर हीने 93.17 टक्के गुण मिळवनु अनुक्रमे दुसरा व तिसरा क्रमांक मिळविला. सायन्स विभागात साक्षी गणेश शिंदे  हीने 86. 50 टक्के गुण मिळवुन दुसरा क्रमांकाने उत्तिर्ण झाली. ईश्‍वरी शरद गाडे ही 86 टक्के गुण मिळवुन तिसाया क्रमांकाची  मानकरी ठरली. सायन्स विभागातुन एकुण 295 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात 90 टक्यांपेक्षा एकाने अधिक गुण मिळविले. 80 ते 89 टक्यांमध्ये 13 विद्यार्थी व 70 ते 79 टक्यांमध्ये 50 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कॉमर्स विभागातुन 83 विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यात 11 विद्यार्थ्यांनी 90 टक्यांपेक्षा अधिक गुण मिळविले. 30 विद्यार्थ्यांनी 80 ते 89 टक्यांमध्ये गुण मिळविले तर 70 ते 79 टक्यांमध्ये 26 विद्यार्थी आहेत. तनुजा आंग्रे हीने बुक किपींग अँड अकाउंटसी विषयात 100 पैकी 100 गुण मिळविले. इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी विषयात तनुजा प्रमोद उंडे, साक्षी परशराम शिंदे व चंचल दत्तात्रय खरात यांनीही 100 पैकी 100 गुण मिळविले. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे अध्यक्ष नितीनदादा कोल्हे, मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे व विश्‍वस्त सुमीत कोल्हे यांनी सर्व गुणवंत विद्यार्थी, त्यांचे भाग्यवान पालक तसेच प्राचार्य डॉ. आर. एस. शेंडगे व त्यांच्या सर्व टीमचे अभिनंदन केले आहे.

COMMENTS