Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजीवनीचा संघ व्हॉलीबॉल स्पर्धेत राज्यात प्रथम

कोपरगाव तालुका ः  आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयो

विश्‍वासार्हता हे वर्तमानपत्राचे खरे भांडवल ः विजय कुवळेकर
Ahmednagar : मोहरम विसर्जन उत्साहात… जागेवरच केले विसर्जन… l LokNews24
मनपा अधिकाऱ्यांना शहरांमधील खड्ड्यात झोपविनार: शिवसेनेचा इशारा

कोपरगाव तालुका ः  आंतर अभियांत्रिकी पदविका विद्यार्थी क्रीडा संघटना (आयईडीएसएसए), महाराष्ट्र  राज्य प्रायोजित व संजीवनी के.बी.पी. पॉलीटेक्निक आयोजित राज्य स्तरीय मुलांच्या व्हॉलीबॉल स्पर्धेत संजीवनी पॉलीटेक्निकच्या व्हॉलीबॉल संघाने मुंबईच्या के.जे. सोमैया पॉलीटेक्निक संघाविरूध्द उत्कृष्ट  खेळाचे प्रदर्शन  करीत 2-1 सेटने अंतिम सामना जिंकुन राज्यातील पॉलीटेक्निक्स व फार्मसीच्या सुमारे 750 संस्थांमधुन अव्वल असल्याचे सिध्द केले. संजीवनी पॉलीटेक्निकने शैक्षणिक  गुणवत्तेबरोबरच क्रीडा क्षेत्रातही बोलबाला असल्याचे यावरून सिध्द झाले आहे, अशी  माहिती संजीवनी पॉलीटेक्निकने प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली आहे.
          पत्रकात पुढे म्हटले आहे की महाराष्ट्र  शासनाच्या वतीने आयईडीएसएसए मार्फत राज्यातील पॉलीटेक्निक्स व फार्मसी संस्थांच्या विध्यार्थ्यांच्या  प्रथम विभागीय पातळीवर स्पर्धा घेण्यात आल्या. विभागीय पातळीवरील विजयी संघांची राज्य स्तरीय व्हॉलीबॉल स्पर्धा संजीवनीच्या पॉलीटेक्निकच्या व्हॉलीबॉल मैदानावर झाल्या. या राज्य स्तरीय स्पर्धांमध्ये निकराची झुंज देत संजीवनीचा संघ अंतिम फेरीत पोहचला. यात संजीवनीच्या संघाने बाजी मारली. या संघातील सर्व खेळाडूंना आता शासनाच्या नियमानुसार सरकारी नोकर्‍यांमध्ये 5 टक्के जागा राखिव असणार आहे. यापुर्वीही संजीवनीच्या अनेक अशा  राज्य स्तरीय खेळाडूंना सरकारी योजनेचा नोकरीसाठी उपयोग झाला आहे. संजीवनीच्या संघातुन कर्णधार आदित्य संजय भणगे याच्या नेतृत्वाखाली गोपाल पदमसिंग भुंगे, यश  राजेंद्र साबळे, साई बापुसाहेब नवले, बिट्टू कुमार, ऋषिकेश  एकनाथ नंदे, रोहीत संदीप तुपे,गौरव संदीप चांदर,कृष्णा  विकास कड, पार्थ चंद्रशेखर गाडे आणि सक्षम संजय कंक्राळे यांनी उत्कृष्ट ट खेळ दाखवित राज्य स्तरीय विजयी झेंडा फडकविला. संजीवनी ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट्सचे  अध्यक्ष  नितिनदादा कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडू व क्रीडा संचालक  शिवराज पाळणे यांचे अभिनंदन करून खेळाडूंनी भविष्यातही  आपली क्रीडा घौडदौड चालु ठेवावी, असा सल्ला दिला. तर मॅनेजिंग ट्रस्टी अमित कोल्हे यांनी सर्व विजयी खेळाडूंचा छोटेखानी सत्कार करून अभिनंदन केले. यावेळी प्राचार्य ए. आर. मिरीकर, श्री पाळणे व सर्व विभाग प्रमुख आणि डीन उपस्थित होते.

COMMENTS