अकोले/प्रतिनिधी ः शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात.ज्ञान दानाचे हे काम शिंदे सरांनी आहोरात्र केले.

अकोले/प्रतिनिधी ः शिक्षण हे समाज परिवर्तनाचे प्रभावी साधन आहे.शिक्षक ज्ञानदानाचे पवित्र काम करतात.ज्ञान दानाचे हे काम शिंदे सरांनी आहोरात्र केले. म्हणूनच शिक्षणाची पताका आहोरात्र खांदयावर घेणारा वारकरी म्हणजेच संजय शिंदे हे आहेत. असे प्रतिपादन आमदार डॉ. किरण लहामटे यांनी केले. अकोले तालुक्यातील सत्यनिकेतन संस्थेचे डॉ.राजेंद्र प्रसाद प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा शेणित येथील मुख्याध्यापक संजयकुमार शिंदे यांचा सेवापूर्ती व कृतज्ञता सोहळा संपन्न झाला.याप्रसंगी आमदार डॉ.लहामटे व्यापपिठावरून बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रांतिय सचिव लायन अशोक मिस्त्री हे होते.
यावेळी आमदार डॉ. सुधीर तांबे, शिक्षक आमदार नानासाहेब बोरस्ते, उपसंचालक राजाराम बेंडकोळी,कोषाध्यक्ष विवेकजी मदन, एम.एम.भवारी, सरपंच गोविंद करवंदे, शिक्षक बँकेचे संचालक अण्णासाहेब ढगे,संचालक मिलिंदशेठ उमराणी, प्रकाश टाकळकर, विजय पवार, श्रीनिवास एलमामे, प्रकाश महाले,विलास पाबळकर, प्राचार्य बाबासाहेब देशमुख, मनोहर लेंडे, भाऊसाहेब बनकर, मधुकर मोखरे, सदाशिव गिरी,धनंजय पगारे,शाळेचे मुख्याध्यापक ज्ञानदेव आरोटे, बी.एस.चौधरी यांसह सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, आजी माजी विदयार्थी, ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.
COMMENTS