राजकारणात जर तर ला महत्त्व नसते. हायपोथिकल पध्दतीच्या गोष्टी राजकारण त्याज्य ठरवते. परंतु, प्रत्यक्षात हे सत्य नाही. भविष्यात आपले राजकारण कसे पु
राजकारणात जर तर ला महत्त्व नसते. हायपोथिकल पध्दतीच्या गोष्टी राजकारण त्याज्य ठरवते. परंतु, प्रत्यक्षात हे सत्य नाही. भविष्यात आपले राजकारण कसे पुढे न्यायचे, याचे आराखडे बांधूनच राजकीय पक्ष पुढे जातात. इथपर्यंत, सर्व वास्तव वाटते. परंतु, जेव्हा खा. संजय राऊत असं म्हणतात की, आरएसएस ने ठरवले तर, १५ मिनिटांत सक्षकार पाडू शकते. नरेंद्र मोदी हा फॅक्टर गेली ५०-६० वर्षे राजकारण करणाऱ्या राजकीय नेत्यांनाही समजून घेता आलेला नाही. मोदी समजलेच नसतील तर त्यांची शक्ती कशी समजेल, हा प्रश्न साहजिकच उभा राहतो. वास्तविक, नरेंद्र मोदी यांना या निवडणुकीत सत्ता प्राप्ती इतकं बहुमत मिळाले नाही. मात्र, यातून त्यांनी देशाची एक मेख ओळखली की, बहुजन संकल्पनेत येणारा समाज हा संघ प्रणित विचारांच्या विरोधात आहे; त्याचे प्रतिबिंब प्रत्यक्ष २०२४ च्या निवडणुक निकालात दिसून आले. त्यातही, अयोध्या या मतदारसंघात एका अनुसूचित जातीच्या उमेदवाराने उच्च जातीच्या उमेदवाराचा सहज पराभव केला. ही बाब देशाची मानसिकता नेमकी काय आहे हे अधोरेखित करणारी ठरली आहे. परिस्थितीचे अर्थ समजून घेण्यात मोदी माहिर आहेत.
सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथविधी घेणाऱ्या मोदींनी त्याचदिवशी ७१ जणांना मंत्रीमंडळात समाविष्ट करून घेतले. यातील ४५ पेक्षा अधिक मंत्री बहुजन समाजाचे आहेत. ही बाब संघाला खटकली. त्यामुळे, दुसऱ्याच दिवशी संघ प्रमुखांनी मोदींचे नाव न घेता त्यांच्या अहंकारावर टिका केली. विरोधी पक्षाऐवजी प्रतिपक्ष असं व्यांख्यांकित करून त्यांनी मोदींना घेरण्याचे सूचकपणे मांडले. परंतु, प्रत्यक्षात संघाने मोदींना घेरण्याची बाब ही संघर्ष उभी करणारी ठरू शकते. भाजप आणि संघ अशा दोन्ही ठिकाणी हा भाग उद्भवू शकतो.
मंडल नंतर राममंदिर उभारणीचा मुद्दा घेऊन आक्रमक राजकीय वाटचाल करणारी भाजप प्रत्यक्षात राम मंदिराची उभारणी करताच राजकीय ओहोटी ला लागल्याचे २०२४ च्या लोकसभा निकालांनी दाखवून दिले. एवढंच काय प्रत्यक्ष राममंदिराची प्राणप्रतिष्ठा झाली त्याच्या दुसऱ्याच दिवशी, मोदींनी बिहारचे दिवंगत माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न घोषित केला. लगोलग चरणसिंग यांनाही भारतरत्न पुरस्कार घोषित केला.याचा अर्थ स्पष्ट आहे की, राममंदिर उभारणीचा विषय आता निवडणुका जिंकून देऊ शकत नाही, याची जाणीवच नव्हे तर समज मोदींना काही क्षणात आली होती. मोदींचा हा निर्णय भाजपला बहुजन चेहरा देण्याच्या दिशेने जाऊ शकतो, हे जवळपास स्पष्ट झाले होते. परंतु, मंत्रीमंडळात देखील ते बहुजन पर्याय स्वीकारतील असा कोणी विचार केला नव्हता. प्रत्यक्षात मात्र त्यांनी कृती केली. हीच बाब संघाला खटकली आणि त्यांनी मोदींवर आपलं टिकास्त्र सोडले.
वरील वस्तुस्थिती चा विचार केला तर, खासदार संजय राऊत यांनी जे म्हटले की, संघ १५ मिनिटांत सरकार पाडू शकतो, यात तेवढे सत्य जाणवत नाही. याऊलट, खासदार संजय राऊत ज्या पक्षाचे खासदार आहेत, त्या उध्दव बाळासाहेब ठाकरे या शिवसेनेने आपल्या राजकीय विचारसरणी आणि राजकीय चरित्रात जो बदल घडवला तो सामाजिक आहे. अशा प्रकारचा सामाजिक बदल आपणांस करावाच लागेल, हे जाणून असलेल्या मोदींनी मंत्रीमंडळाच्या गठनातून आपल्या यापुढील राजकारणाचा एक सामाजिक संदेश तयार केला आहे. यातच, संघ-भाजप यांचा संघर्ष लपलेला आहे. अर्थात, संघ-भाजपवर वरच्या जाती समुहाची आजही पकड असल्याने या संघर्षात वरच्या जाती समुहाची भक्कम पकड राहीलच.
COMMENTS