Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊत यांना सकाळी उठलं की 50 खोकेच दिसतात – शंभूराज देसाई

नागपूर प्रतिनिधी - ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली केलेल्या वक्तव्य वर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देत बोल

डीलरशीप देण्याच्या आमीषाने केली…13 लाखाची फसवणूक
एकतर्फी प्रेमातून तरुणीची हत्या, युवक गंभीर जखमी | LOKNews24
जरे हत्याकांडातील आरोपी बोठेच्या पत्नीने धमकावले…;संबंधितांवर कारवाई करण्याची रुणाल जरेंची पोलिस अधीक्षकांकडे मागणी

नागपूर प्रतिनिधी – ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी आज दिल्ली केलेल्या वक्तव्य वर राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी उत्तर देत बोलले की, संजय राऊत यांना सकाळी उठलं की 50 खोकेच दिसतात. मागे जे संजय राऊत हे जेल मध्ये गेले होते ते कोणत्या पूण्यकर्मासाठी गेले होते. पत्राचाळीच्या घोटाळ्यामध्ये किती खोक्यांचा व्यवहार याचं उत्तर देखील संजय राऊत यांनी द्यावं. संजय राऊत ज्यांच्यासाठी बोलतात त्यांचा कडे काय चालतं आणि फ्रिज भरून कोणाकडे काय जातं याचा पुनरुच्चार आम्हाला करायला लावू नये.    

खासदार संजय राऊतांनी SIT वर प्रश्न उपस्थित केल्यावर देसाई बोलले की, त्या प्रकरणात नवीन काही गोष्टी शासनाकडे आल्या आहेत त्यावर गोष्टीवर चौकशी होणे गरजेचं आहे. जे अधिकार राज्यसरकारच्या गृहविभागाला आहे. त्याच कक्षेत राहून चौकशी होत आहे, त्यांना भीती नसेल तर त्यांनी चौकशीला समोर जावं.

COMMENTS