Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संजय राऊतांना अबू्रनुकसानीच्या खटल्यात जामीन

न्यायालयाने ठोठावली होती 15 दिवसांची कैद

मुंबई ः खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिव

Sanjay Raut : निवडणुकीतील पराभवाच्या भीतीनेच मोदी सरकारने काळे कायदे मागे घेतले | LokNews24
खा.संजय राऊतांविरोधात गुन्हा दाखल
Sanjay Raut : लखीमपूर घटनेत सरकार कोणाला वाचवतंय?

मुंबई ः खासदार संजय राऊत यांच्याविरोधात मेधा किरीट सोमय्या यांनी दाखल केलेल्या अब्रूनुकसानीच्या खटल्यात माझगाव न्यायालयाने संजय राऊत यांना 15 दिवसांची कैद व 25 हजार रुपयांच्या आर्थिक दंडाची शिक्षा ठोठावली होती. या खटल्यात न्यायालयाने संजय राऊत यांना जामीनही मंजूर केला आहे. त्यांना वरच्या कोर्टात अपिल करण्यासाठी कोर्टाने 30 दिवसांचा अवधी दिला आहे.न्यायालयाने गुरूवारी हा निकाल दिला.
शौचालय प्रकरणात संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांचे नाव घेत आरोप केले होते. त्यानंतर त्यांनी राऊत यांच्यावर अब्रूनुकसानीचा दावा केला होता. संजय राऊत यांनी मेधा सोमय्या यांना मीरा-भाइंदरमध्ये मिळालेल्या शौचालयात कामात गैरव्यवहार केला असल्याचा आरोप केला होता. मागील दोन वर्षांपासून हे प्रकरण न्यायालयात सुरू होते. त्यावर आता न्यायालयाने हा निकाल दिला आहे. संजय राऊत यांनी केलेल्या आरोपाचे पुरावे द्यावे, अशी मागणी मेधा सोमय्या यांनी आपल्या याचिकेत केली होती. या प्रकरणात न्यायालयाने आता आपला निकाल दिला असून संजय राऊत यांना 15 दिवसांच्या कैदेची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तसेच त्यांना 25 हजारांचा दंड देखील करण्यात आला आहे.आता या प्रकरणात खासदार संजय राऊत वरच्या न्यायालयात दाद मागण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

काय आहे शौचालय घोटाळा? – वर्ष 2022 मध्ये मीरा-भाईंदर शहरात 154 सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील 16 शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवक प्रतिष्ठानला मिळाले होते. या कामात बनावट कागदपत्र सादर करून मीरा-भाईंदर महापालिकेच्या अधिकार्‍यांची फसवणूक केल्याचा आरोप मेधा सोमय्यांवर खासदार संजय राऊत यांनी केला होता. युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून मेधा सोमय्या आणि त्यांच्या कुटुंबानेच केलेला हा घोटाळा असल्याचा आरोप देखील संजय राऊत यांनी केला होता.

COMMENTS