Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या अध्यक्षपदी संजय गुप्ता तर सचिवपदी सुरेश बुद्धदेव

बीड प्रतिनिधी - रोटरीची स्थापना 1905 मध्ये झाली,आणि सध्या दोनशे पेक्षा जास्त देशामध्ये रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू आहे.त्याचाच एक भ

माजी सरन्यायाधीशांचा बाणेदारपणा
दिल्लीतील एम्स रुग्णालयात अग्नितांडव
पुणे जिल्ह्यातील बँकेवर भरदिवसा दरोडा

बीड प्रतिनिधी – रोटरीची स्थापना 1905 मध्ये झाली,आणि सध्या दोनशे पेक्षा जास्त देशामध्ये रोटरीच्या माध्यमातून समाजसेवेचे काम सुरू आहे.त्याचाच एक भाग म्हणून रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनची स्थापना स.न.1991मध्ये झाली गेल्या एकतीस वर्षापासून रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊन समाज उपयोगी काम करते.एक जुलै ते तीस जून असा हा रोटरी वर्षाचा कार्य काळ असतो,प्रत्येक वर्षी नूतन अध्यक्ष, सचिव यांची निवड होत असते.रोटरी वर्ष 2023-24 या वर्षा करीता अध्यक्षपदी रो.संजय गुप्ता व सचिवपदी रो.सुरेश बुद्धदेव  यांची निवड झाली आहे.
   पद्ग्रहण सोहळ्याचे मुख्य अतिथी दिपस्तभ फाउंडेशन जळगाव चे संस्थापक अध्यक्ष यजुवेंद्र महाजन हे उपस्थित राहणार आहेत,तसेच माजी प्रांतपाल रो.हरिष मोटवाणी व सहाय्यक प्रांतपाल रो.डॉ. निशिकांत पाचेगावकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.बीड येथील प्रसिद्ध डॉ. श्रीकिसन लखमीचंद लोढा यांना मान्यवरांच्या हस्ते सेवागौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
  दिनांक 5 ऑगस्ट,वार शनिवार वेळ सायंकाळी 7 वा. हॉटेल निलकमल ,नगर रोड,बीड. येथे रोटरी क्लब ऑफ बीड मिडटाऊनच्या नूतन अध्यक्ष, सचिव तसेच संचालक मंडळाचा पद्ग्रहण सोहळा व सेवागौरव पुरस्कार सोहळ्यासाठी सर्वानी उपस्थित राहावे असे आवाहन मावळते अध्यक्ष रो.सुनील पारख,  सचिव रो.बालाजी घरत,प्रोजेक्ट चेअरमन रो.दिनेश लोळगे व रो.सी.ए. आदेश नहार  यांनी केले आहे.

COMMENTS