Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

देवस्थान ईनाम जमिनी खालसा करण्याच्या मागणीसाठी सोमवारी सांगलीत मोर्चा

सांगली / प्रतिनिधी : देवस्थान ईनाम वर्ग तिनच्या जमिनी खालसा करुन कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावावर करा, या प्रमुख मागणीसाठी सोमवार, दि. 25 रोजी जिल

विजयादशमीनिमित्त झेंडूची फुले ऐंशी ते शंभर रुपये किलो (Video)
अन्यथा सहकार मंत्र्याची शिमगा दिवाळी साजरी करू : आ. सदाभाऊ खोत
15 दिवसांत कारखाना सुरु करा : मदन भोसले यांचे नूतन संचालकांना आवाहन

सांगली / प्रतिनिधी : देवस्थान ईनाम वर्ग तिनच्या जमिनी खालसा करुन कसणार्‍या शेतकर्‍यांच्या नावावर करा, या प्रमुख मागणीसाठी सोमवार, दि. 25 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती किसान सभेचे जिल्हाध्यक्ष उमेश देशमुख यांनी दिली. किसान सभेच्या जिल्हा कमिटीची बैठकीत मोर्चाच्या तयारीचा आढावा घेतला. दिगंबर कांबळे, गुलाब मुलाणी, चंद्रकांत गोडबोले, दिलीप शुक्ला, युवराज गुरव, ईक्बाल शिरोळकर, रमेश पाटील, शहाजीराव गुरव, बाळासाहेब गुरव उपस्थित होते.
एप्रिल 2016 वक्फ बोर्डाने परिपत्रक काढून ईनाम वर्ग तिनच्या जमिनीवर वक्फ बोर्ड सत्ता प्रकार अशी नोंद करुन 7/12 पत्रकावरील शेतकर्‍यांची नावे कमी करावीत, असे सर्व जिल्हाधिकारी यांना कळवले आहे. त्याची अंमलबजावणी सर्व जिल्ह्यात करण्यात आली आहे. असा प्रकार करणे म्हणजे ईनामी जमीन कसणार्‍या शेतकर्‍यांना कागदोपत्री बेदखल करणे आहे. हा या शेतकर्‍यांच्यावर अन्याय आहे.
देवस्थान ईनामी जमिनीबाबत कोणताही कायदा अस्तित्वात नसताना असा प्रकार करणे चुकीचे आहे. हाच प्रकार मंदीराची सेवा करण्यासाठी दिलेल्या जमिनीबाबत घडतो आहे. या जमिनीसंदर्भात 7/12 पत्रकावर केलेले बदल पुर्ववत करावेत, अशी आमची मागणी आहे.
जमिनी कसणार्‍या शेतकर्‍यांनी पिढ्यानपिढ्या राखल्या, विकसित केल्या, स्वत: भांडवल उभा करुन अन्न धान्य उत्पादनात भर टाकली. आणि आता त्या शेतकर्‍यांनी हुसकावुन लावण्याचा प्रकार घडत आहे. हे किसान सभा कदापी सहन करणार नाही. म्हणून इतर सर्व ईनामे ज्या पध्दतीने खालसा केली. त्याच पध्दतीने देवस्थान ईनाम तीन खालसा करुन शेतकर्‍याच्या नावावर करण्यात यावे, या मागणीसाठी आम्ही मोर्चा काढणार आहोत. मोर्चाची सुरुवात सोमवार, दि. 25 रोजी 11 वाजता क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला अभिवादन करुन होईल. मोर्चात मोठ्या संख्येनी सहभागी होण्याचे अवाहन करण्यात आले आहे.

COMMENTS