Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर शेतकी संघ राज्यात प्रथम क्रमांकाचा ः थोरात

शेतकी संघाची 65 वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात

संगमनेर ः शेतीसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा या उद्देशाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या शेतकी संघाने काटकसर, पारदर्शकता या

फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत ः थोरात
‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात
स्वातंत्र्य लढ्यात क्रांती दिनाचे महत्त्व अतुलनीय ः थोरात

संगमनेर ः शेतीसाठी आवश्यक बाबींचा पुरवठा व्हावा या उद्देशाने सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांनी स्थापन केलेल्या शेतकी संघाने काटकसर, पारदर्शकता यातून दमदार वाटचाल करत राज्यात  प्रथम क्रमांक मिळवला असून काळानुरूप बदल करत नवीन व्यवसाय सुरू करावे असे प्रतिपादन राष्ट्रीय वर्किंग कमिटीचे सदस्य तथा माजी महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांनी केले आहे. संगमनेर शेतकी सहकारी संघाच्या 65 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत ते बोलत होते यावेळी अध्यक्षस्थानी चेअरमन संपतराव डोंगरे हे होते तर व्यासपीठावर माजी आ. डॉ.सुधीर तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, दुर्गाताई तांबे, बाबासाहेब ओहोळ आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, शेतकी संघ ही संगमनेरच्या सहकारी संस्थांची मातृ संस्था आहे.राज्यात अनेक शेतकी संघ मोडकळीस आले असताना संगमनेरचा शेती संघ मात्र दिमाखात उभा आहे.अत्यंत शिस्तबद्ध पद्धतीने काटकसरीतून कारभार सुरू असून आगामी काळात स्पर्धेत राहण्यासाठी नवीन उद्योग व्यवसाय सुरू करावे लागणार आहेत. संगमनेरच्या सर्व सहकारी संस्था ह्या राज्यासाठी दिशादर्शक ठरल्या आहेत. निळवंडे धरण व कालवे आपण पूर्ण केले. वितरिका बाकी असून त्या आपणच करणार आहोत. वितरिकांसाठीचा प्रस्ताव आपण शासनाकडे दिला आहे. यावर्षी सुदैवाने सर्वत्र चांगला पाऊस झाला असून चार रोटेशन मिळू शकतात अशी परिस्थिती आहे निळवंडे पाण्यामुळे अर्थव्यवस्था अधिक समृद्ध होणार असल्याचेही ते म्हणाले. तर माजी आमदार डॉ. तांबे म्हणाले की, आमदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेरचा सहकार हा देशासाठी ग्रामीण विकासाचा पॅटर्न ठरला आहे. चेअरमन संपतराव डोंगरे म्हणाले की, सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात यांच्या मार्गदर्शक तत्त्वावर शेतकी संघाची वाटचाल सुरू असून शेतकरी सर्वसामान्य माणूस यांच्या हितासाठी शेती संघाने काम केले आहे. शेतकी संघ हा सर्वसामान्य आपला वाटतो असे सांगताना शेतकी संघाच्या कामकाजाचा आढावा सांगितला. या वार्षिक सर्वसाधारण सभेच्या नोटीस चे वाचन मॅनेजर अनिल थोरात यांनी केले . स्वागत व्हा. चेअरमन सुनिल कडलग यांनी केले तर सचिन दिघे यांनी आभार मानले.

COMMENTS