Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

संगमनेर बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव खेमनर

संगमनेर/प्रतिनिधी ः विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या स

गावठी दारूचा महापुर! पोलीसांकडून अर्थपुर्ण दुर्लक्ष? पहा ‘माझं गाव, माझी बातमी’ | LokNews24
टीईटी पेपरफुटीचे संगमनेर कनेक्शन चर्चेत
गोदावरी नदी स्वच्छता अभियानात साई ग्रुप सक्रिय

संगमनेर/प्रतिनिधी ः विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली राज्यात अग्रगण्य असलेल्या संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी शंकरराव हनुमंता पा. खेमनर यांची फेरनिवड झाली असून उपसभापतीपदी आश्‍वीचे गीताराम दशरथ गायकवाड यांची एकमताने निवड झाली आहे.
संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात निवडणूक निर्णय अधिकारी सर्जेराव कांदळकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत शंकरराव पा. खेमनर यांच्या चेअरमनपदाची सूचना कैलास पानसरे यांनी मांडली तर निलेश कडलग यांनी अनुमोदन दिले. तसेच व्हा.चेअरमन पदासाठी गिताराम गायकवाड यांच्या नावाची सूचना अरुण वाघ यांनी मांडली तर यांनी सतीश खताळ यांनी अनुमोदन दिले. या निवडीनंतर काँग्रेसचे वरिष्ठ नेते व मा.महसूल मंत्री आमदार बाळासाहेब थोरात यांच्या हस्ते नवनिर्वाचित सभापती व उपसभापती यांची यशोधन जनसंपर्क कार्यालयात सत्कार करण्यात आला. यावेळी समवेत कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, कारखान्याचे अध्यक्ष बाबासाहेब ओहोळ, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष मिलिंद कानवडे, अजय फटांगरे, जि प सदस्य रामहरी कातोरे, उपसभापती नवनाथ आरगडे, बापूसाहेब गिरी,  नवनिर्वाचित संचालक- कैलास पानसरे,सुरेश कान्होरे, सतीश खताळ, मनीष गोपाळे, सुधाकर ताजने, अनिल घुगे, सखाराम खेमनर ,सौ दिपाली भाऊसाहेब वर्पे, रुक्मिणी शिवाजी साकोरे, मनसुख शेठ भंडारी, शेख निसार गुलाब,वाघ अरुण, संजय खरात, निलेश कडलग, विजय सातपुते, सचिन करपे आदी उपस्थित होते. निवडणूक सहाय्यक अधिकारी म्हणून सचिव सतीश गुंजाळ यांनी काम पाहिले. यावेळी बोलताना आमदार थोरात म्हणाले की, संगमनेर तालुक्यातील सर्व सहकारी संस्था ह्या राज्याला आदर्शवत आहेत. कृषी उत्पन्न बाजार समितीने आपल्या गुणवत्तापूर्ण कामातून राज्यात लौकिक निर्माण केला आहे. शेतकरी व्यापारी यांना अत्याधुनिक सुविधा देताना विविध ठिकाणी उपबाजार सुरू केले आहे. नेतृत्वाची समृद्ध परंपरा लाभलेल्या या बाजार समितीमध्ये नवनिर्वाचित संचालक मंडळ हे चांगले काम करताना या बाजार समितीचा गौरव वाढवतील असा विश्‍वास त्यांनी व्यक्त करताना नवनिर्वाचित संचालकांना शुभेच्छा दिल्या. या नूतन पदाधिकार्‍यांचे विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात, माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, आमदार सत्यजित तांबे, नगराध्यक्ष दुर्गाताई तांबे, अ‍ॅड. माधवराव कानवडे, बाजीराव पा. खेमनर, रणजितसिंह देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्रीताई थोरात, इंद्रजीत भाऊ थोरात, सुधाकर जोशी लक्ष्मणराव कुटे, सुनंदाताई जोर्वेकर, मीराताई शेटे यांसह विविध पदाधिकार्‍यांनी अभिनंदन केले आहे.

COMMENTS