Sangamner : संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (Video)

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangamner : संगमनेरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आंदोलन (Video)

कोरोनाच्या महामारी मुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. त्यातच या हुकूमशाही केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली

रोटरी क्लबतर्फे करणार कमर्शिअल चक्की वाटप
संगमनेर नगरपरिषदेचे काम राज्यासाठी आदर्शवत ठरेल
महसूलमंत्री ना. थोरात यांच्या नेतृत्वामुळे संगमनेरचा सहकार पॅटर्न दिशादर्शक – नामदार कदम

कोरोनाच्या महामारी मुळे जनता प्रचंड त्रस्त झाली आहे. त्यातच या हुकूमशाही केंद्र सरकारने पेट्रोल, डिझेल व गॅस सिलेंडर मध्ये मोठ्या प्रमाणात दरवाढ केली आहे . त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांचे  अक्षरशा कंबरडे मोडले आहे. या दरवाढीच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने राज्यभरात आंदोलन करण्यात आले. संगमनेर शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने आज गुरुवार दिनांक 21 ऑक्टोबर रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास प्रांत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. यावेळी केंद्र सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या सदस्या यांनी तर प्रांत कार्यालयासमोरील रस्त्यावर चूल पेटवून त्यावर भाकरी भाजल्या आणि गॅस सिलेंडर च्या टाकीला पुष्पहार घातला. दिवसेंदिवस गॅसची दरवाढ होत असून त्यामुळे आता आम्हा महिलांना पुन्हा एकदा चुलीवर स्वयंपाक करावा लागणार आहे .अशी व्यथा त्यांनी मांडली. यावेळी नायब तहसीलदार रमाकांत कडनोर व संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी निवेदन स्वीकारले. 

COMMENTS