संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील खड्ड्यांमध्ये शिवप्रतिष्ठाणच्या वतीने वृक्षलागवड करून आंदोलन करण्यात आले . वेळोवेळी पाठपुरावा करुनहि
संगमनेर तालुक्यातील साकुर पठार भागातील खड्ड्यांमध्ये शिवप्रतिष्ठाणच्या वतीने वृक्षलागवड करून आंदोलन करण्यात आले .
वेळोवेळी पाठपुरावा करुनहि निवेदने देऊन देखील सबंधित प्रशासनाकडुन उडवाउडवीची उत्तरे तसेच कुठलीही कार्यवाही झाली नसल्याने साकुर पठार भागातील ग्रामस्थ व शिवप्रतिष्ठाण, महाराष्ट्र राज्य संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले.
तहसीलदार,उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, खासदार, पालक मंत्री, जिल्हा पोलीस अधीक्षक, घारगांव पोलीस स्टेशन तसेच सबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना सदर निवेदन देण्यात आले.
साकुर पठार भागातील बहुतांश रस्ते हे खड्डेमय झाले असून अपघातांचे प्रमाण देखील तुफान वाढले आहे. शेतकऱ्यांना मालवाहतूक करण्यासाठी खुप अडचणी निर्माण होत आहेत. यामध्ये रणखांब फाटा ते दरेवाडी, साकुर ते नांदुर खंदरमाळ , मांडवे बुद्रुक ते वरवंडी
साकुर पठार भागातील जनतेच्या वतीने या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. तरी सदर निवेदनावर जनसामान्यांच्या होणाऱ्या हाल-अपेष्टा लक्षात घेऊन योग्य ती कार्यवाही व्हावी असे निवेदनात म्हटले होते.
COMMENTS