Sangali :  छत्रपती शिवाजी चौकात व्यसनी तरुणांनी केली दगडफेक

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

Sangali : छत्रपती शिवाजी चौकात व्यसनी तरुणांनी केली दगडफेक

मिरजेत नशेखोराचा आणि व्यसनी तरुणाचा धुमकुळ चालूच आहे, गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चायनीज विक्रेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक

Sangali : मिरज शहर सुधार समितीची जिल्हा न्यायालयाकडे मागणी (Video)
सांगली – पुरग्रस्तांना मदत न मिळाल्याने चक्काजाम आंदोलन
Sangali : हॉस्पिटल मधील कर्मचाऱ्यांचे काम बंद आंदोलन (Video)

मिरजेत नशेखोराचा आणि व्यसनी तरुणाचा धुमकुळ चालूच आहे, गुरुवारी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर चायनीज विक्रेत्यांच्या गाड्यांवर दगडफेक करून शैलेश शिंदे यांना मारहाण करून डोके फोडण्यात आले.या प्रकरणी पाच ते सहा हल्लेखोरांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली. मिरज रेल्वेस्थानक ,बस स्थानक, परिसरासह शहरात अन्य ठिकाणी नशेखोरांनी उपद्रव सुरू केला आहे. गुरुवारी ५ ते ६ तरुणांनी  गांज्याच्या नशेत छत्रपति शिवाजी पुतळा चौकात धिंगाणा घातला. किरकोळ कारणावरून चायनीज विक्रेत्यांचे डोके फोडून मारहाण केली .मारहाणीत शैलेश‌ शिंदे हा तरुण जखमी झाला आहे.दगडफेक करुन गाडीची  मोडतोड करण्यात आली.हा प्रकार सुरू असताना चौकात मोठी गर्दी जमली होती.जखमी शैलेश आणि सौरभ,अक्षय ओंकार ,निकोलोस,रोहन या तरुणांवर मिरज शहर पोलिसात तक्रार दिली.छत्रपती शिवाजी चौक परिसरात नशेखोर तरुणांचा वारंवार उपद्रव सुरु आहे.नागरिकांनी वेळोवेळी तक्रार केल्यानंतर देखील त्यांच्यावर कारवाई होत नसल्याने नशेत हाणामारी चे प्रकार सुरू आहेत.

COMMENTS