Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

समताचा बारावीचा निकाल यंदाही गुणवत्तापूर्ण ः कोयटे

कोपरगाव शहर प्रतिनिधी- समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. बोर्ड इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा 2023-24 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कोपरगाव

फायनान्स कंपनीच्या तगाद्याला कंटाळून तरुण शेतकर्‍याची आत्महत्या
संजीवनीच्या सहा अभियंत्यांची नोकरीसाठी निवड
माजी उपमख्यमंत्री अजित पवार यांचा भाजप कार्यकर्त्यांनी अडवला ताफा.

कोपरगाव शहर प्रतिनिधी– समता इंटरनॅशनल स्कूलचा सी.बी.एस.ई. बोर्ड इयत्ता 12 वी विज्ञान शाखेचा 2023-24 चा निकाल नुकताच जाहीर झाला असून त्यात कोपरगाव येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या सीबीएसई 12 वी विज्ञान शाखेचा निकाल 100 टक्के लागला असून याही वर्षी गुणवत्तापूर्ण निकालाची परंपरा विद्यार्थ्यांनी कायम राखली असल्याची माहिती समता इंटरनॅशनल स्कूलच्या कार्यकारी विश्‍वस्त स्वाती कोयटे यांनी दिली.
समता इंटरनॅशनल स्कूलचे इ.12 वी विज्ञान शाखेतील सर्व विद्यार्थी प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाले असून यात सुजल फुलसुंदर याने 97.2 टक्के गुण मिळवत प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मानसी वाकडे हिला 90.4 टक्के तसेच खुशी कोठारी हिला 86 टक्के गुण मिळाले असून यांनी अनुक्रमे द्वितीय, तृतीय क्रमांक मिळविला आहे.सर्वेश कांगणे याने 85 टक्के गुण मिळवत यश संपादन केले आहे तर गायत्री देठे, अवनी कुलकर्णी, रोधा काळे, क्रिशना काळे,समृद्धी भुसारे, मृदुला सोनकुसळे, आशिष पानसरे, राजहंस आढाव, प्रेरणा सदाफळ, प्रतीक साळुंखे, तनिष्का औताडे, रूद्रा काले, शाश्‍वत सोनकुसळे, अंकुर कुकरेजा आदी विद्यार्थ्यांनी प्रथम श्रेणीमध्ये यश संपादन केले आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे समता इंटरनॅशनल स्कूलचे संस्थापक अध्यक्ष ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, मॅनेजिंग ट्रस्टी स्वाती कोयटे, मुख्य कार्यवाहक संदीप कोयटे,व्यवस्थापन समितीचे सदस्य, प्राचार्या हर्षालता शर्मा, शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. तालुक्यातील सर्व स्तरातून यशस्वी विद्यार्थ्यांचे कौतुक होत असून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

COMMENTS