Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भारतीय बौद्ध महासभा अहिल्यानगर शहर शाखेतर्फे समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर उत्साहात

अहिल्यानगर : दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, अहिल्यानगर शहर शाखेतर्फे व जिल्हा दक्षिण विभाग यांच्या वतीने आयोजित समता सैनिक

गटशिक्षणाधिकारी यांच्या दालनात विद्यार्थ्यांनी भरवली शाळा 
चंपाषष्ठी निमित्त खंडोबादेवाची सासुरवाडी नेवासा बुद्रुकला एक लाख भाविकांनी घेतले दर्शन
बालकांच्या सुपोषणासाठी नागरी बाल विकास केंद्र उपयुक्त : मंत्री आदिती तटकरे
Displaying MIR_4481.jpeg

अहिल्यानगर : दि. बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया भारतीय बौद्ध महासभा, अहिल्यानगर शहर शाखेतर्फे व जिल्हा दक्षिण विभाग यांच्या वतीने आयोजित समता सैनिक दल प्रशिक्षण शिबिर १५ ते १६ नोव्हेंबर दरम्यान भिंगार येथील सिद्धार्थ बुद्ध विहार येथे उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. शिबिराचे उद्घाटन भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष आयुष्यमान राजेंद्र साळवे, जिल्हा संरक्षण उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव गोरख केदारे, तालुका अध्यक्ष नितीन साळवे तसेच शहर शाखेचे पदाधिकारी यांच्या उपस्थितीत शहराध्यक्ष दिपक पाटोळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले.
या दोन दिवसीय प्रशिक्षणासाठी मेजर जनरल हिरामण अहिरे यांनी प्रशिक्षक म्हणून कार्यभार सांभाळला. त्यांनी शिस्त, संघटन, सामाजिक बांधिलकी आणि दलाची भूमिका याबाबत शिबिरार्थींना प्रभावी मार्गदर्शन केले. एकूण २४ शिबिरार्थींनी प्रशिक्षण पूर्ण करून समता सैनिक दलाचा गौरवशाली मान मिळवला. शिबिर यशस्वी करण्यासाठी जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे, संस्कार उपाध्यक्ष भगवंतराव गायकवाड, संरक्षण उपाध्यक्ष संतोष गायकवाड, सचिव किशोर कांबळे, शहर संस्कार उपाध्यक्ष बौद्धाचार्य लक्ष्मण माघाडे, विजय तात्या कांबळे, रवींद्र कांबळे, माधवराव चाबुकस्वार, सुरेश पानपाटील, प्रवीण ओरे, युवा नेते प्रतीक बारसे तसेच भिंगार सदर बाजार विहार पंच कमिटी व स्थानिक नागरिकांचे सहकार्य लाभले.
शहराध्यक्ष दिपक पाटोळे म्हणाले, बहुजन समाजावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध लढण्यासाठी, संविधानाचे रक्षण करण्यासाठी व आंबेडकरी विचार जपण्यासाठी समता सैनिकदलाची आजची गरज अधिक आहे. तर जिल्हाध्यक्ष राजेंद्र साळवे यांनी सांगितले की, महाराष्ट्रात समता सैनिक दल कमांडर भिमराव यशवंतराव आंबेडकर यांच्या आदेशानुसार दोन लाख सैनिक घडवण्याचे उद्दिष्ट आहे. त्याच ध्येयातून अहिल्यानगरमध्ये हे प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे.
प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या समता सैनिकांमध्ये
विजय लक्ष्मण पाटोळे, विजय चाबुकस्वार, सुरेश पानपाटील, विनोद मिरपगार, प्रतीक ठोकळ, नित्यानंद कांबळे, राजेंद्र पाडळे, लक्ष्मण माघाडे, रामदास खरात, बापूराव भिंगारदिवे, संदेश भोसले, चंद्रकांत सरोदे, शशिकांत घोडके, नरेश खडसे, विजय कांबळे, संतोष जाधव, संजय डहाणे, युवराज बनसोड, अनिल जाधव, सनी माघाडे, गौतम पाचारणे, विशाल पवार, बापू कांबळे, प्रवीण ओरे यांचा समावेश आहे. शहराध्यक्ष दिपक पाटोळे यांनी सर्व नव्या सैनिकांचे अभिनंदन करून पुढील सामाजिक कार्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सांगता ‘सरनेते गाथा’ म्हणून करण्यात आली.

COMMENTS