कोपरगाव शहर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत अग्रस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्था, सुधन गोल्ड लोन, समता इंटरनॅशनल स्कूलमधील अधिकारी, शि
कोपरगाव शहर प्रतिनिधी: महाराष्ट्रातील पतसंस्था चळवळीत अग्रस्थानी समता नागरी सहकारी पतसंस्था, सुधन गोल्ड लोन, समता इंटरनॅशनल स्कूलमधील अधिकारी, शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचार्यांसाठी ’समता प्रीमियर लीग क्रिकेट चॅम्पियनशिप 2024’ चे आयोजन समता इंटरनॅशनल स्कूलच्या भव्य क्रिडांगणावर करण्यात आले होते. या क्रिकेट स्पर्धेचे बक्षिस वितरण समारंभ तालुक्यातील कोकमठाण येथील समता इंटरनॅशनल स्कूलच्या प्रांगणात समता परिवाराचे संस्थापक ओमप्रकाश दादाप्पा तथा काका कोयटे, समता पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल, चांगदेव शिरोडे, कांतीलाल जोशी, उद्योजक भरत अजमेरे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहात संपन्न झाला.
या प्रीमियर लीगचा करंडक समता चॅलेंजर संघाने पटकावत प्रथम पारितोषिक व 11, 000/- चे बक्षिसे मिळविले तर समता रायडर्स संघाने द्वितीय पारितोषिक मिळवत 7,000/- रूपयांचे बक्षीस मिळविले. तिसर्या पारितोषिकासाठी समता सुपर जायंटस व सुधन गोल्ड लोन स्ट्रायकर्स यांच्यात सामना झाला. यात सुधन गोल्ड लोन स्ट्रायकर्सने विजय मिळवत तृतीय पारितोषिक व 5,000/- रुपयांचे बक्षीस मिळविले. तसेच अंतिम सामन्यात सुपर चॅलेंजर संघाचा फलंदाज योगेश गीते यांने सामनावीर व स्पर्धेत मालिकावीराचा किताब मिळविला. या प्रसंगी समता पतसंस्थेचे संचालक अरविंद पटेल यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून विजयी संघातील खेळाडूंचे व उत्कृष्ट कामगिरी करणार्या खेळाडूंचे अभिनंदन करत समता परिवारातील प्रत्येक सदस्याने सांघिकपणा जपत समताने उंच भरारी घ्यावी.अशी इच्छा व्यक्त केली. या लीगमध्ये समता पतसंस्थेतील मुख्य कार्यालयातील अधिकारी, कोपरगाव, शिर्डी, राहता, राहुरी, श्रीरामपूर, येवला, वैजापूर शाखेतील शाखाधिकारी व कर्मचारी, सुधन गोल्ड लोनमधील अधिकारी व कर्मचारी, समता इंटरनॅशनल स्कूलमधील शिक्षक – शिक्षकेत्तर कर्मचारी, वाहतूक विभागातील चालक अशा 100 खेळाडूंनी समता डेअर डेविल्स, समता जेंटलमन इलेव्हन, समता लायन्स, समता किंग्स इलेव्हन अशा 8 संघात सहभाग नोंदविला होता.
येथील सामने 6 षटकांचे, उपांत्यपूर्व व उपांत्य सामना 8 षटकांचा होता. क्रिकेट स्पर्धा यशस्वीतेसाठी समता इंटरनॅशनल स्कूलचा क्रिडा विभाग, आस्वाद मेस विभाग, वाहतूक विभाग, यांनी विशेष परिश्रम घेतले. समता सहकार, शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहे. या विविध कार्य क्षेत्राच्या माध्यमातून नवनवीन योजना व उपक्रमांद्वारा समाजात वेगळे स्थान निर्माण केले आहे. हे स्थान निर्माण करण्यात या विविध क्षेत्रातील समता परिवारातील सदस्यांचा महत्त्वाचा सहभाग आहे. परिवारातील सदस्यांसाठी वेगवेगळ्या योजना व उपक्रम राबवून मानसिक,शारीरिकदृष्ट्या परिपक्व बनविण्याचा मानस असतो. त्यामुळे परिवारातील सदस्यांसाठी या क्रिकेट प्रीमियर लीगचे आयोजन केले होते. या स्पर्धेतून समताचे सदस्य हे अधिकारी, लिपिक, लेखापाल, शिक्षक, शिपाई च नाही तर उत्कृष्ट खेळाडू देखील आहे.
COMMENTS