Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सलमान खान च्या फॅन्सनी सिनेमागृहात फटाके फोडत ‘टायगर 3’चे केले स्वागत

  मालेगाव प्रतिनिधी - दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी भाईजानच्या चाहत्यांनी मोहन सिनेमागृहात थेट फटाक्यांची जोरदार आ

आषाढी वारीसाठी वारकर्‍यांच्या वाहनांना पथकरातून मिळणार सवलत
 फडणवीस महिलांवर फिदा झाले आहेत
चोपडा तालुक्यात गेल्या आठवड्यात  झालेल्या अवकाळी पाऊसामुळे कांद्यापिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान

  मालेगाव प्रतिनिधी – दिवाळीची सर्वत्र धामधूम सुरू असताना लक्ष्मीपूजनच्या दिवशी भाईजानच्या चाहत्यांनी मोहन सिनेमागृहात थेट फटाक्यांची जोरदार आतषबाजी करत गोंधळ घातला आहे. जवळपास 10 मिनिटे अनेक वेगवेगळे फटाके उडवले आहेत. या घटनाक्रमामुळे सिनेमाचा खेळ मध्येच बंद करावा लागला आहे. विशेष म्हणजे, छावणी पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर हा सर्व धक्कादायक प्रकार घडला आहे. मालेगाव शहरामध्ये सलमान खान आणि शाहरुख खानच्या चाहत्यांची मोठी संख्या आहे. संबंधितांचे सिनेमा प्रदर्शित झाल्यावर त्यास चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. उत्साहाच्या भरात त्यांच्याकडून अनेकवेळा मोठ्या प्रमाणात गोंधळ घातल्याची उदाहरणे बघायला मिळाले आहेत. रविवारी रात्री मोहन सिनेमागृहात त्याची पुनरावृत्ती झाली आहे. लक्ष्मी पूजनच्या दिवशी म्हणजे रविवारी रात्रीच्या सुमारास या सिनेमागृहात भाईजानच्या टायगर तीन या सिनेमाचा खेळ होता. नेहमीप्रमाणे चाहत्यांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती.

सिनेमा सुरू झाल्यानंतर काही चाहत्यांनी वेगवेगळे फटाके फोडण्यास सुरुवात केली. आणि रॉकेट्सही सोडले होते. यामुळे अन्य प्रेक्षकांची मोठ्या प्रमाणात धांदल उडाली होती. जवळपास 10 मिनिटे बॉम्ब, रॉकेट्स, फुलझाड आणि वेगवेगळे फटाक्यांची आतषबाजी सुरू होती. बाल्कनीतील चाहते शिट्या वाजवून नाचत त्याचे समर्थन करत होते. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घालत आहे. या घटनेची माहिती मिळताच रात्री साडेअकरा वाजता पोलीस सिनेमागृहात दाखल झाले होते. काही वेळात अग्निशमन दलाचा बंब देखील त्याठिकाणी पोहोचला. गर्दीत संशयितांना ओळखणे अवघड झाले होते. या गोंधळामुळे काही चाहते आधीच बाहेर पडले होते. हुल्लडबाजी टाळण्यासाठी अखेर खेळ बंद करण्यात आला. या प्रकरणी छावणी पोलीस ठाण्यात अद्याप कोणत्याही प्रकारची नोंद करण्यात आली नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. दरम्यान याच सिनेमागृहात गेल्या महिन्यात किंग खानच्या सिनेमावेळी देखील अशीच हुल्लडबाजी प्रेक्षकांनी केल्याचे बघायला मिळाले होते.

COMMENTS