Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

किनवट तालुक्यात दारूची ज्यादा दराने विक्री

राज्य उत्पादन शुल्क विभाग नशेत

किनवट प्रतिनिधी - राज्य उत्पादन शुल्क उपविभाग, कार्यालय गोकुंदा येथेच असताना गोकुंदा येथील देशी दारू दुकानातून सत्तर रुपये एमआरपी किंमत असलेली भि

उन्हाळी हंगामातील सिंचनासाठी मांजरा प्रकल्पातून पाच बॅरेजेसमध्ये सोडले पाणी
डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या  जयंतीनिमित्त वंचितवतीने रक्तदान शिबिराचे कोल्हारी येथे आयोजन
मराठवाडा भूकंपांच्या धक्कयाने हादरला

किनवट प्रतिनिधी – राज्य उत्पादन शुल्क उपविभाग, कार्यालय गोकुंदा येथेच असताना गोकुंदा येथील देशी दारू दुकानातून सत्तर रुपये एमआरपी किंमत असलेली भिंगरी 80 रुपये मध्ये म्हणजे एका भिंगरी मागे तब्बल दहा रुपये अधिकचे घेऊन विक्री होत असताना संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकारी हे कामगाराच्या,कष्ट करणार्‍या मजुराच्या, हमाल रिक्षावाल्या असाह्य माणसाची लचके तोडण्याचे काम करण्याचे कंत्राट घेतले की काय असा प्रश्न येथे उपस्थित होत आहे. उन्हातानात घाम गाळून मेहनतीचे चार पैसे कमावणार्‍या मजुरांची अशी पिळवणूक येथील अधिकार्‍याच्या आशीर्वादाने गोकुंदा सह तालुक्यातील देशी दारू दुकानातून होताना दिसून येत आहे. एका भिंगरी मागे दहा दहा रुपये जास्त चे घेऊन नफा खोरी करीत एका दुकानातून पाचशे भिंगर्‍या विक्रीतून पाच हजार रुपये निव्वळ कमावणार्‍या दुकानाची अनुज्ञप्ती तातडीने रद्द  करावी. या आदिवासी भागात यवतमाळ जिल्ह्यातील बोगस बनावटी दारू वितरित होते. गाव तेथे देशी विदेशी दारू नियमबाहेरीत्या वितरित होते.  या अवैध देशी विदेशी दारू विक्रेत्यांना  मदत, सहकार्य, मूक संमती देणार्‍या संबंधित राज्य उत्पादन शुल्क अधिकार्‍याची तात्काळ प्रभावाने चौकशी जिल्हा दंडाधिकारी नांदेड यांनी तातडीने करावी अशी मागणी या भागातील नागरिकांची आहे अन्यथा एक मे कामगार दिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर प्राणांतिक उपोषणाचा इशारा सजग नागरिकाकडून दिला जात आहे.

COMMENTS