Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

तलवाडा येथे खताची चड्या भावाने विक्री ; शेतकर्‍यांची पिळवणूक

गेवराई प्रतिनिधी - तलवाडा येथे शेतकर्‍यांना कृषी दुकान दरांकदून खताची कृतीम टंचाई दाखवत ज्यादा पैसे घेण्याचा सपाटा लावला असून,तलवाडा येथे असणारी

शासनाचे पैसे रखडले…गावकर्‍यांनी दिले उसने…; हिवरे बाजारने लावली अखेर विकास कामे मार्गी
आपत्तीग्रस्तांना वाढीव दराने मदत
मनोज जरांगे यांच्या उपोषणाला पाठींब्या देण्यासाठी पाथर्डीत लोकशाही मार्गाने बैठा सत्याग्रह

गेवराई प्रतिनिधी – तलवाडा येथे शेतकर्‍यांना कृषी दुकान दरांकदून खताची कृतीम टंचाई दाखवत ज्यादा पैसे घेण्याचा सपाटा लावला असून,तलवाडा येथे असणारी डिलरशिफ गेवराई येथून चालवत आहेत,त्यामुळे तलवाडा येथे खताची चढ्या दराने विक्री थांबवावी,प्रत्येक कृषी अस्थापन केंद्रावर भावफलक लावण्यात यावे ,शेतकर्‍यांना बियाणे व खते खरेदीची पक्की पावती न देणा:या दुकानदारावर कारवाई करण्यात यावी,खताचा कृत्रिम तुडवडा करण्यात येऊ नये,शेतकर्‍यांना लागेल तेवढे खत खरेदी करण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आधार लिंक प्रमाणे खत व औषधे विक्री न करणार्‍या दुकानदारावर व धत कंपन्यावर योग्य कारवाई करण्यात यावी अशी मागणी शेख खिजरभाई,जयदेव शिंगणे,रमेश नाटकार यांनी तालुका कृषी अधिकारी तसेच गटविकास अधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
सद्यस्थितीत खरिप हंगाम सुरु असून शेतकरी यांनी शेतकरी यांची सध्या खते व बियाणे खरेदीची लगभग सुरु आहे.तलबाडा व तलवाडा परिसरातील शेतकरी यांनी आपल्या शेतात पेरणी व लागवड केलेली आहे. परंतु तलवाडा येथी कृषी दुकानदार यांनी शेतकरी यांची जाणून बुजून पिळवणूक सुरु केली आहे.तलवाडा येथील कृषी दुकानदार हे संगनमताने जाणूनबुजून खतांचा व बियाण्याचा तुटवडा भासवित आहे.केंद्र सरकार व राज्य सरकार च्या धोरणानुसार राज्यात कुठलाही खते व बियाणे यांचा तुटवडा नाही असे सांगितले जाते. प्रत्यक्षात कृषी विभागाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या आशीर्वादाने सदर निगरगट्ट गेंड्याच्या कातडी पांघरलेल्या लोकामुळे सर्व सामान्य शेतकरी, गरीब अल्पभूधारक शेतकरी यांची पिळवणूक होत आहे. शेतकरी खते व औषधे, बियाणे खरेदी करण्याकरिता गेले तर मागणी केलेले खाते न देता बोगस कंपनीचे खाते करण्याचा आग्रह करी आहे. मागणी केलल्या कंपनीचे खते व औषधे मागितले तर आमच्याकडून सर्व खरेदी करावी तरच आम्ही तुम्हाला खते उपलब्ध करून देऊ अशी आडमुठी भूमिका कृपी विक्रेता दुकानदार यांच्याकडून घेतली जाते.केंद्र सरकार व राज्य सरकारच्या धोरणानुसार शेतकरी हा कृषी केंद्र तून जे पाहिजे व जेवढे पाहिजे तेवढेच खरेदी करू शकतो असा नियम व कायदा असून सुद्धा शेतकरी यांची शासनमान्यता प्राप्त कंपनीचा युरिया मागितला तर आमच्याकडून बियाणे व औषधी खरेदी केली नाही म्हणून देण्यास स्पष्ट नकार देतात. यामुळे शेतकरी हा निराश होऊन परत जातो. काही दुकानदार यांनी खूप मोठी साठवणूक करून शेतकरी यांना चढ्या भावाने विक्री करत आहे. काही दुकानदार हे तर शेतकरी ग्राहक यांना आपली खूप मोठी कृषी अधिकारी व कर्मचारी, तहसीलदार यांच्यासोबत लागेबांधे आहे आमचे तक्रार करून काही होत नाही. अशी शेतकरी ग्राहक यांच्यासमोर भूमिका घेतात. यामुळे त्रस्त शेतकरी हा अगोदरच आत्म्हत्याच्या दारात उभा असून त्याला असे परेशान करणे बरोबर नाही. आधार लिंक जाांचे अंगठे घेतले त्यांची व शेतकरी यांची फेरचौकशी करण्यात यावी अशी मागणी शेतकरी नेते शेख खिजरभाई,जयदेव शिंगणे,रमेश नाटकर यांच्या सह सहकारी उपस्थित होते.

COMMENTS