Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साक्षी शर्मांची विद्यापीठ महाराष्ट्र युवा  संसद – 2023 संघात सचिवपदी निवड

अंबाजोगाई प्रतिनिधी - अंबाजोगाई चे नाव उच्च स्तरावर घेऊन जाणारी साक्षी सुरेश शर्मा सर्व स्तरांतून होतयं अभिनंदन : मुख्यमंत्र्यांची घेणार भेट अंबा

पहिल्याच दिवशी जवानचा रेकॉर्ड थिएटरबाहेर चाहत्यांचा जल्लोष, पहिलाच शो हाऊसफुल
राज्यातील सहकारी पतसंस्थांना दिलासा
त्र्यंबक मध्ये एटीएम मध्ये पुरेसे पैसे नसतात यात्रेकरूंची होते अडचण 

अंबाजोगाई प्रतिनिधी – अंबाजोगाई चे नाव उच्च स्तरावर घेऊन जाणारी साक्षी सुरेश शर्मा सर्व स्तरांतून होतयं अभिनंदन : मुख्यमंत्र्यांची घेणार भेट अंबाजोगाई येथील यशवंतराव चव्हाण महाविद्यालय, बी. कॉम. प्रथम वर्षाची विद्यार्थिनी तसेच राष्ट्रीय सेवा योजनेची स्वयंसेविका साक्षी सुरेश शर्माची डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ अंतर्गत महाराष्ट्र युवा संसद – 2023 निवडणूक, राष्ट्रीय सेवा योजना युवा मंत्रालय, मुंबई येथे सचिवपदी निवड करण्यात आली आहे. दिनांक 17 एप्रिल 2023 रोजी विद्यापीठाच्या संघाबरोबर साक्षी शर्मा ही विधान भवन, मुंबई येथे दिनांक 18 एप्रिल 2023 रोजी मंत्रालय कामकाज, राज्यपाल भवन, मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची भेट अशा विविध उपक्रमात सहभागी होणार आहे. महाविद्यालयाच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे कार्यक्रमाधिकारी व विभाग प्रमुख डॉ. इंद्रजीत भगत यांच्या मार्गदर्शनाखाली साक्षी शर्मानी यश मिळवले आहे. याच प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवदास शिरसाट, उपप्राचार्य प्रा. रमेश शिंदे, प्रा. प्रताप जाधव आणि सर्व कर्मचार्‍यांनी साक्षी शर्मा व डॉ. इंद्रजीत भगत यांचे विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS