Homeताज्या बातम्यादेश

तृणमूल काँगे्रसचे साकेत गोखलेंना अटक

पंतप्रधान मोदींबाबत केलेल्या ट्विटमुळे कारवाई

जयपूर वृत्तसंस्था - पश्‍चिम बंगारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली

रस्त्याच्या वादातून 70 वर्षीय वृद्धाला मारहाण
भाजप आमदार जयकुमार गोरेंचा उच्च न्यायालयाने जामीन फेटाळला
‘ध्वजदिन’ ही सैनिकांच्या कुटुंबियांप्रती कृतज्ञता : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

जयपूर वृत्तसंस्था – पश्‍चिम बंगारच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस पक्षाचे नेते साकेत गोखले यांना गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. मोरबी पूल दुर्घटनेवरुन सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर केलेल्या पोस्टबद्दल गुजरात पोलिसांनी ही कारवाई केली. मोरबी दुर्घटनेनंतर साकेत गोखले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत एक ट्विट केले होते. हे ट्विट करून गोखले यांनी चुकीची माहिती समाजात पसरवण्याचा प्रयत्न केला असा त्यांच्यावर आरोप आहे. गोखले यांना अटक झाल्याची माहिती तृणमूल पक्षाचे नेते डेरेक ओ ब्रायन यांनी दिली आहे.


ब्रायन यांनी ट्विट करत गोखले यांच्या अटकेची माहिती देताना म्हटले आहे की, साकेत गोखले हे सोमवारी रात्री 9 वाजता दिल्लीहून विमानाने जयपूरला आले होते. इथे पोहोचताच त्यांना अटक करण्यात आली. रात्री 2 वाजता गोखले यांनी त्यांच्या आईला त्यांना अटक झाल्याची माहिती दिली होती. यावेळी त्यांनी आईला सांगितले होते की त्यांना अहमदाबाद इथे नेण्यात येत आहे. गोखले यांना अटकेनंतर एक फोन करण्याची परवानगी देण्यात आली होती, हा फोन होताच त्यांचा फोन आणि त्यांच्याजवळचे सगळे सामान पोलिसांनी जप्त केले आहे. त्यांच्या अटकेबाबत बोलताना डेरेक यांनी म्हटले आहे की, अहमदाबाद सायबर पोलीस ठाण्यात गोखले यांच्याविरोधात एक खोटी केस दाखल करण्यात आली होती.

गोखले यांनी केलेल्या ट्विटमुळे त्यांच्याविरोधात ही केस दाखल करण्यात आली होती. 1 डिसेंबर 2022 रोजी गोखले यांनी दावा केला होता की मोरबी पूल दुर्घटनेनंतर पंतप्रधानांचा जो पाहणी दौरा आयोजित करण्यात आला होता, त्यासाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. हे ट्विट करत असताना गोखले यांनी एका गुजराती वर्तमानपत्राचे कात्रणही जोडले होते. या वर्तमानपत्राने बातमी प्रसिद्ध केली होती की मिळालेल्या माहितीनुसार पंतप्रधानांच्या मोरबी दौर्‍यासाठी 30 कोटी रुपये खर्च करण्यात आले होते. या बातमीचा हवाला देत गोखले यांनी म्हटले होते की, यातले 5.5 कोटी रुपये हे निव्वळ पंतप्रधानांच्या स्वागतासाठी, फोटोग्राफीसाठी आणि कार्यक्रमाच्या आयोजनावर उडवण्यात आले होते. गोखले यांनी दावा केला होता की मोदींच्या इव्हेंट मॅनेजमेंट आणि जनसंपर्कासाठी खर्च केलेल्या रकमेचे मूल्य हे 135 लोकांच्या जीवापेक्षा अधिक आहे. कारण या 135 लोकांच्या कुटुंबियांना प्रत्येकी 4 लाखांची मदत देण्यात आली होती ज्याची बेरीज ही 5 कोटी रुपये आहे. गोखले यांचे हे ट्विट बरेच चर्चेत आले होते. गुजरात भाजपने हे आरोप फेटाळताना म्हटले होते की, अशा प्रकारची आरटीआय अंतर्गत कोणीही माहिती मागवली नव्हती आणि आरटीआय अंतर्गत असे कोणतेही उत्तर देण्यात आलेले नाही. ही निव्वळ थाप असून खोटी बातमी आहे असे भाजपने म्हटले होते.

COMMENTS