Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

राज्यस्तरीय नृत्य स्पर्धेत साई प्रेरणा कलामंच प्रथम

मनसेतर्फे शिवजयंतीनिमित्त स्पर्धा उत्साहात

जामखेड प्रतिनिधी ः राहुल उद्योग समूह व मनसे यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने जामखेडमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समुह नुत्य स्पर्धेत आलीबाग

भारत टॅलेंट सर्च परीक्षेमध्ये शद्विका अमोल चंदनशिवेचे यश
*अजितदादांना हवी सोशल मीडियावर प्रसिद्धी, 6 कोटी करणार खर्च | सुपरफास्ट महाराष्ट्र | LokNews24
सुधा मुर्ती गुरू शुक्राचार्य महाराजांच्या चरणी लिन

जामखेड प्रतिनिधी ः राहुल उद्योग समूह व मनसे यांच्या वतीने शिवजयंती निमित्ताने जामखेडमध्ये घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय समुह नुत्य स्पर्धेत आलीबाग येथील साई प्रेरणा कलामंचने प्रथम क्रमांक मिळविला. तर वैयक्तिक नृत्य स्पर्धेत मोठ्या गटात अभय जोगदंड बीड तर लहान गटात कार्तिक लेहने बीड यांना मिळाला आहे. यावेळी आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
 या नृत्य स्पर्धेत महाराष्ट्रातील अलिबाग, सातारा पुणे, बीड, नगर, बारामती, येथील 300 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सालाबाद प्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने राहुल उद्योग समूह व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत मनसे नेते पै हवा सरनोबत, सरपंच बापुसाहेब कारले यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक कलाकारांसह राज्यातील नवोदित कलाकारांसाठी व्यासपीठ उपलब्द व्हावे याकरिता 18 ते 19 रोजी दोन दिवस राज्यस्तरीय नृत्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सकाळी मान्यवरांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले यावेळी तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, युवा नेते निलेश गायवळ, उद्योजक हवादादा सरनोबत, माजी बापूसाहेब कार्ले, प्रदीप टाफरे, सनी सदाफुले, संतोष फिरोदिया, वैभव जामकावळे, गणेश डोंगरे, काझी स्टोन क्रशर, पै आलेश जगदाळे, विभीषण कदम, गणेश पवार, मिलद कांकरिया, अमोल कदम, मदन गोलेकर, पोपट कार्ले, पै नितीन जाधव, यांच्यासह नागरिक मोठ्या संख्नेने उपस्थित होते. स्पर्धेच्या लहान गटातील निकाल पुढील प्रमाणे लागला. राज्यस्तरीय वैयक्तिक लहान गटात प्रथम क्रमांकाचे 7 हजाराचे बक्षीस कार्तिक लिहने, व्दितीय क्रमांकाचे 5 हजार विभागून तेजस्विनी शेळके, माही घोडेराव, तृतीय क्रमांकाचे 3 हजार बक्षीस विभागून दिव्या अंधारे, अतिश गिरी, चतुर्थ क्रमांकाचे 2 हजाराचे बक्षीस विशाल शिंदे, वैयक्तिक मोठ्या गटात प्रथम क्रमांक 11 हजार अभय जोगदंड, द्वितीय क्रमांकाचे 7 हजार अनामिक अहिरे, तृतीय क्रमांकाचे 5 हजार माधवी आढाव, चतुर्थ क्रमांकाचे 3 हजार बक्षीस विभागून कीर्ती घायतड्क व राहुल सूर्यवंशी, तर समूह नृत्य स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे 31 हजाराचे बक्षीस अलिबाग येथील साई प्रेरणा कला मंचने द्वितीय क्रमांकाचे 21 हजाराचे जीएनडी ग्रुप पुणे, तृतीय क्रमांकाचे 11 हजाराचे संस्कृती ग्रुप बीड, चतुर्थ क्रमांकाचे 7 हजार एचडीए ग्रुप बारामती या स्पर्धाकांना सन्मानचिन्ह व प्रशस्तीपत्रक रोख रक्कम देण्यात आले या स्पर्धेला परीक्षक म्हणून पुणे येथील रुतुंध्रा माने. अविनाश नलावडे यांनी काम पाहिले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी श्रीधर सिध्देश्‍वर, पत्रकार ओंकार दळवी, अविनाश बोधले, निलेश दिवटे, रजनीकांत साखरे, वैशिष्ट माने बालु साठे, सोनु कदम मनसेच्या कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. यावेळी नृत्य सादरीकरणातील लक्षवेधी दिलखेचक अदाकारी, धमाल नृत्याला मिळणारी तरुणाईसह महिलांची उत्स्फूर्त दाद मिळाली.

COMMENTS