Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साई मल्टीस्टेटने व्यावसायिकांना आधार देण्याचे काम केले ः खा. लोखंडे

राहुरी/प्रतिनिधी ः छोटया-मोठ्या व्यावसायिकांना आधार देण्याचे काम साई आदर्श मल्टिस्टेटच्या माध्यमातून सुरू आहे. समाजात वावरत असताना विविध क्षेत्रा

रस्त्यात वाहने उभी करणे महागात, दोघांविरुद्ध गुन्हा दाखल
कोपरगावात रविवारी चैत्रोत्सवाचे आयोजन
मुंबईतील चर्चेत धनगर आरक्षणावर तोडगा नाहीच

राहुरी/प्रतिनिधी ः छोटया-मोठ्या व्यावसायिकांना आधार देण्याचे काम साई आदर्श मल्टिस्टेटच्या माध्यमातून सुरू आहे. समाजात वावरत असताना विविध क्षेत्रात चांगले काम करणार्‍यांचे कौतुक करून प्रोत्साहन देणे ही संस्थेचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांची खासियत असल्याचे प्रतिपादन शिर्डी लोकसभा मतदारसंघाचे खा. सदाशिव लोखंडे यांनी केले.
राहुरी फॅक्टरी येथील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चोथे वस्ती रस्ता मजबुतीकरण व डांबरीकरण करण्यास निधी दिल्याबद्दल राहुरी फॅक्टरी येथील साई आदर्श मल्टिस्टेटच्यावतीने खा.सदाशिव लोखंडे यांचा सन्मान सोहळा पार पडला. प्रसंगी खा. लोखंडे बोलत होते. यावेळी साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे यांनी खा.लोखंडे यांचा सन्मान केला. खा. लोखंडे पुढे म्हणाले की, जनतेने केलेल्या प्रेमामुळे मी दोन वेळेस खासदार होऊ शकलो. केंद्रातील मोदी सरकार व राज्यातील शिंदे फडवणीस सरकारच्या माध्यमातून शिर्डी लोकसभा मतदारसंघातील प्रलंबित विकास कामे मार्गी लावण्यासाठी यापुढेही कटिबद्ध असून सामान्य माणूस केंद्रबिंदू मानून विकास हाच आपला ध्यास आहे. अनेक वर्षांपासून रखडलेल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चोथे वस्ती रस्त्याचे कामासाठी जिल्हा नियोजन विभागाच्या विशेष अधिकारातून मंजूरी मिळाली असून लवकरच या कामाला लगेच सुरुवात होईल. साई आदर्श मल्टिस्टेट संस्थेने सदर रस्त्याचा प्रश्‍न मार्गी लावल्याबद्दल आज सन्मान केला. यापुढे निश्‍चित पुढील काळात काम करण्यासाठी ऊर्जा मिळाली असल्याचे ते म्हणाले. साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे म्हणाले की, पक्ष-गट- तट न पाहता सर्वसामान्य व्यक्तींचे काम मार्गी लावण्यासाठी खा.लोखंडे यांची नेहमी धडपड सुरू असते. शेतकरी, विद्यार्थी व परिसरातील नागरीकांसाठी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा ते चोथे वस्ती रस्त्याचे काम पूर्ण होत असल्याने सर्व स्तरातून समाधान व्यक्त होत आहे. साई आदर्श मल्टिस्टेटने 150 कोटींचा तर आदर्श पतसंस्थेने 70 कोटींचा टप्पा पार केला आहे. दोन्ही संस्थांच्या माध्यमातून सामाजिक व धार्मिक काम सुरू आहे. सर्वसामान्य माणसांचा आशीर्वाद मिळावा हाच आमचा हेतू असल्याचे कपाळे म्हणाले. यावेळी साई आदर्श मल्टिस्टेटचे चेअरमन शिवाजीराव कपाळे, जिल्हाप्रमुख राजेंद्र देवकर, उपजिल्हाप्रमुख आण्णा म्हसे, चैतन्य मिल्कचे चेअरमन गणेश भांड, माजी उपनगराध्यक्ष सुखदेव मुसमाडे, आदर्श पतसंस्थेचे चेअरमन विष्णू गीते, व्हा.चेअरमन आबासाहेब वाळुंज, साई आदर्श अ‍ॅग्रोचे चेअरमन वेदांत कपाळे, शिवसेना तालुकाप्रमुख देवेंद्र लांबे, प्रशांत लोखंडे, सुनील कराळे, संपत महाराज जाधव, शांती चौक मित्र मंडळाचे अध्यक्ष दीपक त्रिभुवन, प्रकाश सोनी, शंकरराव हारगुडे, सुनील विश्‍वासराव, संगम रसाळ, विक्रम फाटे, भारत साळवे, किशोर मोरे, पारस नहार, देविदास कोठुळे, , सर्जेराव शेटे, नितीन डंबाळे आदी उपस्थित होते. आभार श्रीकांत जाधव यांनी मानले.

COMMENTS