इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षात साहेबांनी काय केले? याची साक्ष त्यांनी आष्टा-इस्लामपूर शहरासह मतदार संघातील गावा-गावात उभा केलेली विका
इस्लामपूर / प्रतिनिधी : गेल्या 35 वर्षात साहेबांनी काय केले? याची साक्ष त्यांनी आष्टा-इस्लामपूर शहरासह मतदार संघातील गावा-गावात उभा केलेली विकास कामे देतील. मात्र, ही विकास कामे उघड्या डोळ्यांनी पहावी लागतील. साहेबांनी आपले उभे आयुष्य समाजाच्या सेवेला वाहिले, या तालुक्यातील माणूस घडविला, तालुका समृध्द करत राज्यात अग्रेसर ठेवला आहे, याची जाणीव तालुक्याला आहे. त्यामुळे कोण काय म्हणते, याकडे लक्ष देण्या ची गरज काय? असा सवाल युवा नेते, राजारामबापू सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष प्रतिक पाटील यांनी प्रचार दौर्यात व्यक्त केली. या दौर्यात ज्येष्ठ, युवक व महिला मतदारांनी दादांचे उत्स्फूर्त स्वागत करत आम्ही साहेबांच्या पाठीशी आहे, असा विश्वास व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, इस्लामपूर विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार आ. जयंत पाटील यांच्या प्रचारार्थ प्रतिक पाटील यांनी कोळे, नरसिंहपूर, किल्ले मच्छिंद्र गड, बेरडमाची, लवणमाची, शिरटे, येडेमच्छिंद्र, रेठरेहरणाक्ष, वाळवा, शिरगाव, पडवळ वाडी, नवेखेड, जुनेखेड, दुधारी, भवानीनगर, बिचुद, बावची, पोखर्णी, नागाव, ढवळी, फारणेवाडी (शि) कोरेगाव, बागणी आदी गावांचा झंझावाती प्रचार दौरा करून मतदारांशी संवाद साधला. त्यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, युवक राष्ट्रवादीचे तालुका कार्याध्यक्ष देवराज देशमुख होते.
प्रतिक पाटील म्हणाले, साहेबांनी केवळ गेल्या 5 वर्षात 500 कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आणून मतदार संघातील अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. त्यांनी केलेल्या विकास कामांची कार्य पुस्तिका आम्ही सर्वांना दिली आहे. इस्लामपूर शहरातील प्रशासकीय इमारत, तहसिलदार कार्यालय, न्यायालय इमारत, पोलीस स्टेशन, आष्ट्याचे पोलीस स्टेशन इमारत तसेच रेठरे हरणाक्ष पूल, कसबे डिग्रज पूल, दुधगाव पूल, कोरेगाव पूल, नदीवरील घाट, गावांना जोडणारे, रस्ते, ग्रामसचिवालये, गावातील अंतर्गत रस्ते, समाज मंदीरे ही कामे कोणी केली? विरोधक ज्या चौकात सभा घेतात, ते व्यासपीठ आणि खुर्च्या ठेवतात त्या चौकातील पेव्हिंग ब्लॉकही साहेबांनी बसविले आहेत. आपले तुतारी वाजविणारा माणूस हे चिन्ह घरा-घरापर्यंत पोचवा.
या प्रचार दौर्यात गावोगावचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, युवक व मतदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
COMMENTS