Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अखेर सहर शेखचा पोलिसांकडे लेखी माफीनामा

मुंबई :ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर त्

केंद्राकडून 22 जानेवारीला अर्ध्या दिवसाची सुट्टी
क्षणभराचा आनंद 5 वर्षीय रियांशच्या जीवावर बेतला
प्रवीण घुलेंच्या नेतृत्वाखाली काँग्रेस करणार नगरपंचायतीच्या १७ उमेदवारांची तयारी

मुंबई :ठाणे महापालिका निवडणुकीतील विजयानंतर एमआयएमच्या नवनिर्वाचित नगरसेविका सहर शेख यांनी केलेल्या वक्तव्यामुळे निर्माण झालेल्या वादानंतर अखेर त्यांनी पोलिसांकडे लेखी माफी सादर केली आहे. ‘कैसा हराया’ असा उल्लेख करत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना उद्देशून केलेले विधान आणि ‘मुंब्रा हिरवे करू’ अशी घोषणा केल्याने राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या होत्या.
या वक्तव्याविरोधात भाजप नेते किरीट सोमय्या, आमदार निरंजन डावखरे तसेच बजरंग दल आणि विश्‍व हिंदू परिषदेकडून मुंब्रा पोलिस ठाण्यात तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली. चौकशीदरम्यान सहर शेख यांनी आपल्या वक्तव्याचा अर्थ चुकीच्या पद्धतीने मांडला गेल्याचा दावा करत लेखी माफीनामा दिला. माफीनाम्यात सहर शेख यांनी, मुंब्रा येथील सभेत वापरलेले शब्द हे पक्षाचा झेंडा व निवडणूक चिन्ह यांच्या संदर्भात होते, असा खुलासा केला आहे. समाजातील कोणाच्याही भावना दुखावण्याचा किंवा सामाजिक सलोखा बिघडवण्याचा आपला हेतू नव्हता, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. आम्ही तिरंग्यासाठी जगतो आणि तिरंग्यासाठीच जगणार आहोत, असेही त्यांनी माफीनाम्यात नमूद केले आहे. आपल्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर त्याबद्दल त्यांनी जाहीर आणि लेखी स्वरूपात माफी मागितली आहे. सहर शेख यांनी 23 जानेवारी रोजीच हा माफीनामा सादर केल्याची माहिती मुंब्रा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अनिल शिंदे यांनी दिली. या संदर्भात भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पोलिस ठाण्यात भेट देऊन चौकशीचा आढावा घेतला. माफीनामा स्वीकारल्यानंतर पोलिसांनी या प्रकरणाची दप्तरी नोंद केली असून, भविष्यात अशा स्वरूपाची विधाने झाल्यास संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही पोलिसांकडून देण्यात आला आहे.

COMMENTS