Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शासकीय वसतिगृहांतील महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य

मुंबई : सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर  झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिग

चंद्रकांत पाटलांमुळे राज्याचं मनोरंजन होतंय… त्यांच्यावर करमणूक कर लावा
चंद्रकांत पाटलांनी तात्काळ आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा
पथविक्रेत्यांच्या मुलांच्या शिक्षणासाठी सहकार्य करणार : पालकमंत्री

मुंबई : सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर  झालेला अत्याचार आणि हत्या या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून जिथे त्रुटी आहेत त्याची पूर्तता करून महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य देणार असल्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना सांगितले. मरीन ड्राईव्ह, मुंबई येथे सावित्री बाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीवर झालेला अत्याचार  आणि हत्या या घटनेच्या पार्श्‍वभूमीवर शासन स्तरावर कोणकोणत्या उपायोजना केल्या जात आहेत याबाबत विधानपरिषद सदस्य विलास पोतनीस यांनी लक्षवेधी उपस्थित केली होती. मंत्री पाटील म्हणाले की, सावित्रीबाई फुले महिला वसतिगृहातील विद्यार्थीनीना शासकीय वसतिगृह वांद्रे येथे स्थलांतरित केले जाईल. राज्यातील सर्व शासकीय महिला वसतिगृहांची सुरक्षा तपासणी करून डिसेंबर 2023 पर्यंत सर्व सदस्यांकडून आलेल्या सूचनांवर कार्यवाही केली जाईल, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

COMMENTS