Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कोपरगाव एसटी आगारात सुरक्षितता अभियानाला सुरूवात

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य परिवहन यांच्या अहमदनगर विभागाच्या वतीने सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत सुरक्षितता आभियानाचे बुधवार 11 जाने

कोपरगाव शहरात श्री साई सच्चरित्र पारायण सोहळ्याचे आयोजन
मेहता कन्या विद्यालयात शालेय गणित विज्ञान प्रदर्शन उत्साहात
औषधे पुरवणे ठेक्याच्या आमीषाने 31 लाख रुपयांची केली फसवणूक

कोपरगाव प्रतिनिधी ः महाराष्ट्र राज्य परिवहन यांच्या अहमदनगर विभागाच्या वतीने सडक सुरक्षा जीवन सुरक्षा अंतर्गत सुरक्षितता आभियानाचे बुधवार 11 जानेवारी रोजी कोपरगाव शहर पोलिस उपनिरीक्षक भरत दाते यांच्या शुभहस्ते उद्घाटन संपन्न झाले.
कोपरगाव एस टी आगार प्रमुख अभिजित चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून एसटी आगार विभागीय लेखाधिकारी वृंदा कंगले, जेष्ठ पत्रकार महेश जोशी, पत्रकार मनीष जाधव, प्रा.विजय कापसे, आगार वाहतूक अधीक्षक उज्वला कुटे, कार्यशाळा अधीक्षक अमोल बनकर, लेखाकार सुनीता गवळी, अविनाश गायकवाड, पोलिस कॉन्स्टेबल खेमनर यांच्यासह आगारातील प्रशासकीय कर्मचारी, चालक-वाहक, यांत्रिक कर्मचारी आदी मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रसंगी पोलीस उपनिरीक्षक दाते यांनी बोलतांना सांगितले की, रस्ता सुरक्षा ही कोणा एकाची जबाबदारी नसून ती सर्व नागरिकांची समान जबाबदारी आहे त्या मुळे सर्व नागरिकांनी शासन व पोलिसानी रस्ता व वाहतूक सुरक्षा संबधी वेळोवेळी घालून दिलेल्या प्रत्येक नियमांचे काटेकोरपणे पालन केले तर नक्कीच अपघाताचे प्रमाण कमी होईल. त्यामुळे सर्वांनी वाहतूक नियमांचे पालन करत आपले वाहन चालवताना योग्य ती खबरदारी घ्यावी असे आवाहन दाते यांनी करत सर्वाना शुभेच्छा दिल्या. आगर व्यवस्थापक चौधरी यांनी बोलतांना सांगितले की, एस टी चा प्रवास हा सर्वात सुरक्षित प्रवास असुन सर्व सामान्य नागरिकांच्या खिशाला परवडणारा प्रवास आहे त्यामुळे सर्व प्रवाशांनी आरामदायी खाजगी वाहनांतून प्रवास करण्यापेक्षा सर्वात सुरक्षित अशा एस टी बस मधून प्रवास करावा असे आवाहन चौधरी यांनी या प्रसंगी केले. या प्रसंगी लेखाधिकारी वृंदा कंगले, प्रा विजय कापसे यांनी देखील आपल्या मनोगतात रस्ता सुरक्षा विषयी मार्गदर्शन केले. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वाहतूक नियंत्रक संजीव गाडे यांनी तर उपस्थिताचे आभार अमोल बनकर यांनी व्यक्त केले.

COMMENTS