Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सदभावना पुररकार प्राचार्य सोमनाथ रोडे यांना जाहीर

अंबाजोगाई प्रतिनिधी - येथील योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा प्राचार्य बी.के. सबनीस राज्य स्तरीय सद्भावना पुरस्कार

‘कभी खुशी कभी गम’मधील छोट्या करीनाचे गोव्यामध्ये धुमधडाक्यात लग्न
बिग बॉस 15मध्ये रिया चक्रवर्ती आणि अंकिता लोखंडे भिडणार एकमेकींना l पहा LokNews24 —————
राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत सत्ताऱ्यांकडे बहुमताचा अभाव !

अंबाजोगाई प्रतिनिधी – येथील योगेश्वरी शिक्षण संस्था कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने दिला जाणारा प्राचार्य बी.के. सबनीस राज्य स्तरीय सद्भावना पुरस्कार मराठवाड्यातील ख्यातनाम विचारवंत निवृत्त प्राचार्य डॉ. सोमनाथ रोडे यांना जाहीर झाला असून तो आज 20 ऑगस्ट रविवार रोजी वितरीत होणार आहे
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी आधारस्तंभ असलेल्या प्राचार्य सबनीस यांचे सामाजिक समतेसाठीचे कार्य प्रेरणादायी आहे त्यांचे कार्य सुवर्णक्षरांनी नोंद करण्यासारखेच आहे या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांच्या नावे असलेला राज्यस्तरीय सदभावना पुरस्कार लातुरच्या महात्मा बसवेश्वर महाविद्यालयाचे निवृत्त प्राचार्य डॉ.सोमनाथ रोडे यांना योगेश्वरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेश खुरसाळे यांच्या हस्ते येथील नागापुरकर सभागृहात सकाळी 10:30 वा. वितरित करण्यात येणार आहे प्राचार्य डॉ.रोडे यांनी सर्वोदय मंडळ, हिंद स्वराज्य समिती तसेच इतर प्रतिष्ठानच्या माध्यमातून जन सामान्यांसाठी व्यापक कार्य केले आहे.यांची नोंद घेऊन पुरस्कार देण्यात येणार असून या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन पतसंस्थेचे अध्यक्ष मेजर एस.पी.कुलकर्णी, उपाध्यक्ष राजू साळवी,सचिव एस.बी. शिंदे,सहसचिव बी.के. मस्ने,संतोष चौधरी,दिपक देवळे, आदीसह इतर संचालकांनी दिली आहे.

COMMENTS