Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एसटी बँकेच्या व्यवस्थापकीय संचालकाची हकालपट्टी

पुणे सहकार आयुक्तांची कारवाई सदावर्तेंना धक्का

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत येतांना दिसून येत आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानीपणामुळे अने

आव्हाड महाविद्यालयातील बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव
हृतिक रोशन- दीपिकाच्या ‘फायटर’ चा टीझर रिलीज
दरडगाव थडी मायराणीतील भाजप कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीमध्ये प्रवेश

पुणे ः गेल्या काही दिवसांपासून एसटी कर्मचारी बँकेचा मुद्दा चांगलाच चर्चेत येतांना दिसून येत आहे. अ‍ॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या मनमानीपणामुळे अनेक संचालक राजीनामा देण्याच्या तयारीत असल्याच्या चर्चा असतांना गुरूवारी पुण्यातील हसकार आयुक्तांनी एसटी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक सौरभ पाटील यांची हकालपट्टी केली आहे. सौरभ पाटील हे गुणरत्न सदावर्तेंचे मेहुणे आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी हा मोठा धक्का मानला जात आहे.
एसटी को-ऑपरेटीव्ह बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदावरुन सौरभ पाटील यांची हकालपट्टी करण्याचे आदेश पुणे सहकार आयुक्तांनी दिले आहेत. कलम 79 अन्वये सौरभ पाटील यांच्यावर ही कारवाई केली आहे. सौरभ पाटील यांच्या निवडीवरुन मोठा वाद निर्माण झाला होता. सौरभ पाटील यांना बँकिग क्षेत्रातील कोणतेही ज्ञान नाही. तसेच या पदासाठी वयाची 35 वर्ष पूर्ण झालेली असावीत अशी अट आहे. मात्र सौरभ पाटील यांचे वय 25 च्या आसपास आहे. तसेच नियमानुसार त्यांच्याकडे आठ वर्षांपेक्षा जास्त काळाचा अनुभवही नाही. मात्र सौरभ पाटील हे बँकेच्या व्यवस्थापकीय संचालक पदाच्या निकषात बसत नव्हते. त्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे.

COMMENTS