Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ईश्‍वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन विजेता

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : ईश्‍वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात विराट इलेव्हन संघावर एकतर्फी वि

कायद्याची भीती मनातून काढून टाका : जिल्हा न्यायाधीश अनिरुध्द गांधी
गृह भेटीद्वारे वाई मतदार संघात वृध्दांसह दिव्यांग 139 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क
औंधची पोलीस वसाहत फळा-फुलांनी बहरणार ; पोलीस वसाहतीत 100 झाडांची लागवड

ईश्‍वरपूर / प्रतिनिधी : ईश्‍वरपूर प्रीमियर लीग 40 वर्षावरील क्रिकेट स्पर्धेत सचिन इलेव्हन संघाने अंतिम सामन्यात विराट इलेव्हन संघावर एकतर्फी विजय मिळवत विजेतेपद पटकावले. अनुभवी खेळाडूंच्या खेळीने रंगलेल्या या स्पर्धेने क्रिकेट प्रेमींचे लक्ष वेधले.
येथील उरुण परिसरातील शासकीय क्रीडा संकुलाच्या मैदानावर स्पर्धा झाल्या.
या स्पर्धेत तिसर्‍या क्रमांकावर कपिल इलेव्हन तर चौथ्या स्थानावर युवराज इलेव्हन संघ राहिला. अनुभव, खेळभावना आणि मैत्रीचे सुंदर दर्शन घडवणारी ईश्‍वरपूर प्रीमियर लीग स्पर्धा क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी ठरली.
अंतिम सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करणार्‍या विराट इलेव्हन संघाला सचिन इलेव्हनच्या भेदक गोलंदाजीसमोर टिकाव धरता आला नाही. विराट इलेव्हन संघ केवळ 46 धावांत गारद झाला. प्रत्युत्तरादाखल सचिन इलेव्हनने हे आव्हान पूर्ण करत विजेतेपदावर शिक्कामोर्तब केले. या सामन्यात वीरेश देवळालकर यांने अष्टपैलू खेळीचे दर्शन घडवले. फलंदाजीत 35 धावांची झुंजार खेळी केली तर गोलंदाजीत 2 महत्त्वाचे बळी घेत संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. त्यांच्या या शानदार कामगिरीसाठी त्याला सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
सर्व उपांत्यपूर्व फेरीत रंगतदार संघर्ष झाला होता. पण अंतिम सामन्याच्या अगोदर उपांत्य लढती एकतर्फी झाल्या.
पहिल्या उपांत्य सामन्यात विराट स्पोर्ट्स संघाने प्रथम फलंदाजी करत 78 धावा उभारल्या. प्रत्युत्तरादाखल युवराज इलेव्हन संघाला केवळ 43 धावा करता आल्या. या सामन्यात शितल कोठारी यांनी अष्टपैलू कामगिरी करत विराट स्पोर्ट्सला अंतिम फेरीत पोहोचवले. दुसर्‍या उपांत्य सामन्यात कपिल स्पोर्ट्स संघाची फलंदाजी कोलमडली. अवघ्या 29 धावांत संघ सर्वबाद झाला. कपिल स्पोर्ट्सच्या आव्हानाचा पाठलाग करत सचिन इलेव्हन संघाने केवळ तीन षटकांत सामना जिंकला. दिमाखदार पणे अंतिम प्रवेश केला. या सामन्यात अभिजीत पाटील यांनी दोन षटकांत अवघ्या 3 धावा देत निर्णायक 5 बळी घेत सामनावीर पुरस्कार पटकावला.

COMMENTS