Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सचिन धस यांची रणजी ट्रॉफी साठी निवड

बीड प्रतिनिधी - बीसीसीआय च्या रणजी ट्रॉफी आणि मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संभाव्य सीनियर क्रिकेट संघ शनिवारी पुणे येथे जाहीर झा

आरक्षणासाठी परीक्षेत पेपरवर लिहिलं ‘एक मराठा कोटी मराठा
गहुंजे असताना मोशीला 400 कोटींचे स्टेडियम कशाला ? नाना काटे
लोकलमध्ये लेडीज डब्यात साप

बीड प्रतिनिधी – बीसीसीआय च्या रणजी ट्रॉफी आणि मर्यादित षटकांच्या स्पर्धेसाठी महाराष्ट्राचा संभाव्य सीनियर क्रिकेट संघ शनिवारी पुणे येथे जाहीर झाला आहे. बीडचा युवा शैलीदार फलंदाज सचिन धस याचा संभाव्य संघात समावेश करण्यात आला आहे.
सचिन धस हा महाराष्ट्र 19 वर्षाखालील क्रिकेट संघाचा वर्तमान कर्णधार आहे. मागील झालेल्या सीनियर निमंत्रितांच्या स्पर्धेत सचिन धस ने उत्कृष्ट कामगिरी केली होती. बीसीसीआय च्या नॅशनल क्रिकेट अकादमी (एन.सी.ए.-) मार्फत आयोजित शिबिरात सचिन धस चा प्रशिक्षण सुरू आहे. रणजी करंडक स्पर्धेत निवड होणारा सचिन बीड चा एकमेव खेळाडू आहे. सचिन धस ला शेख अझहर याचं मार्गदर्शन लाभल आहे. या प्रसंगी बीड जिल्हा क्रिकेट असोसिएशन चे अध्यक्ष डॉ. भारतभूषण क्षीरसागर, डॉ. योगेश क्षीरसागर सचिव आमेर सलीम, महेश वाघमारे, राजन साळवी, इरफान कुरेशी, मनोज जोगदंड, जावेद पाशा, रिझवान खान, गोपाल गुरखूदे, अतीक कुरेशी, सर्फराज मोमीन, अक्षय नरवडे व पठाण शाहरूख यांनी सचिन धस चे अभिनंदन केले व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

COMMENTS