Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

‘सांज पाडवा’ सांस्कृतिक वैभव जोपासणारा कार्यक्रम ः थोरात

संगमनेर ः संगमनेर शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. सांज पाडवा कार्यक्रमाअंतर्गत भेटी लागे जीवा हा संताच्या

फोडाफोडीच्या राजकारणाविरोधात जनमत ः थोरात
कॉँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष काळे नगर शहराचे आमदार होतील
शेतकर्‍यांच्या जीवनात पशुधनाचे मोठे महत्त्व ः थोरात

संगमनेर ः संगमनेर शहर हे सांस्कृतिक वारसा लाभलेले शहर म्हणून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. सांज पाडवा कार्यक्रमाअंतर्गत भेटी लागे जीवा हा संताच्या अभंगावर आधारित कार्यक्रम संगमनेरच्या सांस्कृतिक वैभवात भर घालणारा उत्तम कार्यक्रम आहे. संगमनेर तालुक्यातील गायक व वादक कलावंताच्या या निमित्ताने विशेष कौतुक वाटते असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात यांनी केले.
दिपावली पाडव्या निमित्त संगमनेर तालुका गायक वादक संघाच्या कलावंताच्यावतीने भेटी लागे जीवा हा महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध संत कवींच्या अभंगावर आधारीत अप्रतिम सांस्कृतिक वारसा जपणारा कार्यक्रम संपन्न झाला. याप्रसंगी कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री आ. बाळासाहेब थोरात, मा. आ. डॉ. सुधीर तांबे, सौ. दुर्गाताई तांबे, गिरीश मालपाणी, संदीप चोथवे, के. के. थोरात, उत्कर्षा  रूपवते, गणेश गोर्डे आदी मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी आ. थोरात यांनी संगमनेर तालुका संघाच्या गायक वादक कलावंताचे विशेष कौतुक केले. या कलावंतांनी संताच्या अभंगाच्या संकल्पनेवर आधारित सामाजिक चेतना निर्माण करणारा कार्यक्रम सादर केल्याबद्दल सर्व कलावंताचे सत्कार करून कौतुक केले . याप्रसंगी माजी आमदार डॉ. सुधीर तांबे यांनी सांज पाडवा हा कार्यक्रम दरवर्षी प्रतीक्षा करायला लावणारा उत्तम कार्यक्रम असून संगमनेर तालुका संघाच्या कलावंतांनी असे अनेक कार्यक्रमाचे आयोजन करून सांस्कृतिक वारसा जपावा असे आवाहन करून उत्कृष्ट कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल सर्वांचे अभिनंदन केले. मालपाणी ग्रुपचे प्रतिथयश उद्योजक गिरीश मालपाणी यांनी याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटन करून शुभेच्छा देताना सांजपाडवा सारखे सांस्कृतिक कार्यक्रम हे संगमनेरचे भूषण आहे. असे सांस्कृतिक कार्यक्रम घडवून आणणे ही आजच्या काळाची गरज आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी  मा. नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे व के. के. थोरात कंस्ट्रक्शन संचालक के. के. थोरात व उत्कर्षाताई रूपवते यांनी ही शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक सिध्दीविनायक कॉर्पोरेशनचे संचालक संदीप चोथवे यांनी प्रास्ताविक करतांना संगमनेर तालुका संघाच्या गायक कलावंताच्या संघटन कौशल्याचे कौतुक करून यापुढेही असेच अप्रतिम कार्यक्रमाची मेजवानी संगमनेर करांसाठी द्यावी अशी अपेक्षा व्यक्त केली. या कार्यक्रमाचे निवेदन डॉ. जितेंद्र पाटील यांनी केले. तर आभार गणेश गोर्डे यांनी मानले. या कार्यक्रमात विकास भालेराव, किर्ती चव्हाण, राम आहेर, वैष्णवी मुर्तडक, पायल रणधीर , क्षितिजा रणधीर, रिया शेवाळे या  गायक कलावंतांनी उत्कृष्ट गायन करून उपस्थितांची मने जिंकली. तसेच एडविन पेरीपाडमन, मंगेश बिडवे, सौरभ रणधीर, प्रथमेश बिडवे, विशाल वाघमारे यांनी वाद्यवृद साथ केली. या कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी गणेश गोर्डे व मालपाणी लॉन्स च्या कर्मचार्यांनी विशेष परिश्रम घेतले.

COMMENTS